02 March 2021

News Flash

डान्सबार बंद झाले पाहिजे: रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी पिंपरी- चिंचवडमधील भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

सुप्रीम कोर्टाने डान्सबारसंदर्भातील कठोर अटी व नियम रद्द केल्याने राज्यात डान्सबार पुन्हा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला असतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. डान्सबार बंद असले पाहिजे, असे दानवे यांनी म्हटले आहे. हे माझे वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी नमूद केले. तर अजित पवार तुरुंगात जाणार का या प्रश्नाचेही त्यांनी उत्तर देणे टाळले आहे.

रावसाहेब दानवे यांनी गुरुवारी पिंपरी- चिंचवडमधील भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डान्सबारसंदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर दानवे म्हणाले, मी अजून सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची प्रत वाचलेली नाही. पण डान्सबार हे बंद असले पाहिजे, हे माझे वैयक्तिक मत असून पक्षाचीही हीच भूमिका आहे, असे त्यांनी नमूद केले.

काही महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवडच्या जाहीर सभेत रावसाहेब दानवे यांनी अजित पवार यांना सिंचन घोटाळ्या प्रकरणी अटक होऊ शकते, असा दावा केला होता. अजित पवारांच्या दारात पोलीस उभे आहेत,कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते असे विधान त्यांनी केले होते. गुरुवारी पत्रकार परिषदेत दानवे यांना पुन्हा एकदा यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. निवडणुकीपूर्वी अजित पवार तुरुंगात जाणार का?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. मात्र, दानवे यांनी या प्रश्नावर मौन बाळगले. तर डोंबिवलीतील भाजपा पदाधिकाऱ्याच्या दुकानातून सापडलेल्या शस्त्रसाठ्याच्या बातमीवरही त्यांनी प्रतिक्रिया देणे टाळले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2019 5:33 pm

Web Title: bjp state president raosaheb danve reaction on sc verdict on dancebar and ajit pawar arrest
Next Stories
1 साताऱ्याचे माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निधन
2 डान्सबारप्रकरणी सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल होणार
3 …म्हणून आर. आर. पाटील यांनी डान्सबारवर घालती होती बंदी
Just Now!
X