News Flash

‘पार्थ’सुद्धा ‘मावळ’णार, भाजपाचा राष्ट्रवादी काँग्रेसवर व्यंगचित्रातून निशाणा

भाजपानेही राष्ट्रवादीच्या व्यंगचित्राला उत्तर दिले आहे

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपावर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका करताच आता भाजपानेही राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. भाजपाने मुख्यमंत्री सत्तेची ठंडाई घोटत आहेत अशा आशयाचे एक व्यंगचित्र पोस्ट केले होते. ज्याला आता भाजपानेही तशाच अंदाजात उत्तर दिले आहे. दादांनी घोटली भांग, साहेबांकडे तिकीट मांग, ताईंनी सुद्धा साधला, नेम यंदा घराण्यातच एकमेकांविरुद्ध गेम अशा ओळी पोस्ट करत एक व्यंगचित्र भाजपाने पोस्ट केले आहे. पार्थ पवारांच्या राजकारण प्रवेशावरून भाजपाने आता राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

या व्यंगचित्रात शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे एकमेकांशी बोलत आहेत. पार्थ पवार भाषण करत आहेत असे दाखवण्यात आले आहे. शरद पवार हे सुप्रिया सुळेंशी बोलत आहेत, पराभवाच्या भीतीने मी सोडले माढा, कारण लोक म्हणत होते शरद पवारांना पाडा, महाराष्ट्रातूनही यंदा राष्ट्रवादी होणार हद्दपार आणि आता अजितचा पार्थसुद्धा ‘मावळ’णार असे शरद पवार सांगत आहेत. तर पार्थ पवार बोलत असताना लोक तुमसे ना हो पाएगा असं म्हणत आहेत. असे या व्यंगचित्रात म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यंगचित्राला भाजपाने उत्तर दिले आहे.

पार्थ पवार यांच्या मावळमधून उमेदवारी देत शरद पवार यांनी माढा येथून माघार घेतली. लोकसभा निवडणूक लढवणार नाही असंच शरद पवार यांनी जाहीर केलं. त्यानंतर पार्थ पवार जेव्हा भाषणाला उभे राहिले तेव्हा मराठीत नीट बोलता आले नाही. या सगळ्याची भाजपाने खिल्ली उडवली आहे. त्याच आशयाचं एक व्यंगचित्र भाजपाने पोस्ट केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 7:13 pm

Web Title: bjp tweets cartoon against ncps cartoon
Next Stories
1 मुख्यमंत्र्यांनी घोटली सत्तेची ठंडाई, शिवसेनेला युतीची नशा-राष्ट्रवादी काँग्रेस
2 प्रतीक पाटील म्हणतात मी भाजपाच्या वाटेवर नाही
3 धनंजय मुंडे म्हणतात, रंग बदलने वालोंको भी होली की शुभकामनाएं
Just Now!
X