News Flash

कॉलर माझी आहे, मी ती चावीन नाहीतर फाडून टाकेन; उदयनराजे भोसले संतापले

"उठसूट कोणाचेही ऐकून घ्यायला मी काही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत"

माझी स्टाईल हा माझा खासगी प्रश्न आहे. कॉलर माझी आहे, मी ती चावीन नाहीतर फाडून टाकेन. तुम्हाला त्याच्याशी काय देणेघेणे आहे असा सवाल उदयनराजे भोसले यांनी टीकाकारांना विचारला आहे. “उठसूट कोणाचेही ऐकून घ्यायला मी काही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. ऐन तारूण्यात मी तुरुंगात गेलो. मात्र, आपण नेहमी अन्यायाविरोधात आवाज उठवला,” असल्याचं उदयनराजे बोसले यांनी सांगितलं आहे.

यावेळी उदयनराजे यांनी राजेशाहीचा आरोप करणाऱ्यांनाही उत्तर दिलं. “राजेशाही असती तर मी बलात्कार करणाऱ्यांना थेट गोळ्या घातल्या असत्या,” असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. विरोधकांनी माझ्यावर राजेशाहीचा आरोप करण्यापेक्षा मुद्द्यांवर आधारित राजकारण करावे असं आवाहन केलं.

शरद पवार साताऱ्यातून निवडणुकीला उभे राहिले तर माघार घेईन – उदयनराजे

भाजपात प्रवेश करण्यावरुन होणाऱ्या टीकेबद्दल बोलताना उदयनराजे भोसले यांनी हे सर्व एकदाचे खलास करून टाका असं म्हणत आपला संताप व्यक्त केला. तसंच शरद पवारांबद्दल आपल्या मनात अजूनही तितकाच आदर असून वडिलांनंतर शरद पवार यांनीच मला आधार दिला. ते पोटनिवडणुकीसाठी उभे राहिले तर बरं होईल, म्हणजे मी बोंबलत फिरायला मोकळा होईन असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

“सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शरद पवार उभे राहिले तर आपण निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेऊ,” असं उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. “शरद पवार निवडणुकीला उभे राहिले तर मी अर्ज भरणार नाही. मला केवळ दिल्लीतील बंगला आणि गाडी द्यावी,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 5:12 pm

Web Title: bjp udyanraje bhosale answer back to opponent sgy 87
Next Stories
1 वंचित बहुजन आघाडीची पहिली २२ उमेदवारांची यादी जाहीर
2 “माझ्यासाठी वडिलांनंतर फक्त शरद पवारच”, उदयनराजे झाले भावूक
3 पक्षनिष्ठा : पवार साहेब, मी शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीत राहिल; कार्यकर्त्याने बॉण्डवर दिलं लिहून
Just Now!
X