News Flash

राक्षसी प्रवृत्तीला संपवण्याची वेळ आता आली आहे – उदयनराजे

हिंगणघाट आणि औरंगाबादमधील घटनेवरुन उदयनराजेंचा संताप

(एक्स्प्रेस फोटो - आशिष काळे)

भाजपा नेते उदयनराजे भोसले यांनी वर्धा येथील हिंगणघाट आणि औरंगाबदमधील घटनेवरुन संताप व्यक्त केला असून महाराष्ट्र पोलिसांनी छत्रपतींचा आदर्श घेऊन आरोपीला जशास तसे उत्तर द्यावे अशी जनभावना तयार होत असल्याचं म्हटलं आहे. हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून माथेफिरू तरुणाने शिक्षिकेला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ही पीडिता जीवन-मृत्यूशी संघर्ष देत आहे. तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये घरात घुसून एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये महिला ९५ टक्के भाजल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.

उदयनराजे यांनी दोन्ही घटनांवरुन संताप व्यक्त करत ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “माणुसपणाला काळीमा फासणारी घटना हिंगणघाट तसंच औरंगाबाद येथे घडली. तरुण प्राध्यापिका व आज औरंगाबाद येथील महिलेला जिवंत जाळण्यात आले. या राक्षसी प्रवृत्तीला संपवण्याची वेळ आता आली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी छत्रपतींचा आदर्श घेऊन आरोपीला जशास तसे उत्तर द्यावे अशी जनभावना तयार झाली आहे”.

वर्ध्यामधील हिंगणघाट येथे तरुण प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार ताजा असतानाच पुन्हा एकदा महाराष्ट्र अशाच एका घटनेने हदरला आहे. औरंगाबादमध्ये घरात घुसून एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामध्ये महिला ९५ टक्के भाजल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील अंधारी गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी संतोष मोहिते या तरुणाला अटक केली आहे. ५० वर्षीय पीडित महिला ही गंभीररित्या भाजली असून तिला उपचारासाठी घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा – “आता बस्स! सहनशीलतेचा कडेलोट होत आहे”, संभाजीराजेंचा संताप

त्या तरुणीची प्रकृती चिंताजनक
एकतर्फी प्रेमातून माथेफिरू तरुणाने जाळल्यामुळे जीवन-मृत्यूशी संघर्ष करणाऱ्या तरुणीवर नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हिंगणघाटच्या एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयासाठी अर्धवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या तरुणीवर एका माथेफिरुन पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. सोमवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणातील आरोपी विकेश नगराळे तिच्या नेहमीच्या मार्गावर आधीच दबा धरून बसला होता. तिला पाहताच त्याने दुचाकीतील पेट्रोल काढून तिच्यावर ओतले आणि अतिशय निदर्यतेने तिला जाळण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरडा केल्यानंतर काहींनी तिच्या अंगावर पाणी ओतून आगीवर नियंत्रण आणले. मात्र, तोपर्यंत ती ४० टक्के भाजली. तिला आधी हिंगणघाट रुग्णालयात आणि नंतर नागपूरच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तिचा चेहरा पूर्णपणे जळाला असून, ती वाचाही गमावण्याची भीती आहे. तसेच डोळे गमावण्याचीही शक्यता आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 3:38 pm

Web Title: bjp udyanraje bhosale tweet on wardha hinganghat and aurangabad incident sgy 87
Next Stories
1 काँग्रेसने शिवसेनेला हिंदुत्त्वापासून दूर नेलं – चंद्रकांत पाटील
2 सावरकरांवर गलिच्छ आरोप झाले तेव्हा शिवसेना शांत का बसली ?, चंद्रकांत पाटील यांचा सवाल
3 पंढरपूर : माघी एकादशीनिमित्त आकर्षक फुलांनी सजले विठ्ठल मंदिर
Just Now!
X