News Flash

‘त्या’ शेतकऱ्याच्या तिन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च भाजपा उचलणार : दरेकर

कुटुंबिंयाना तातडीची एक लाखाची मदतही केली; हे सरकार संवेदनाहीन असल्याचा केला आरोप

विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज (रविवार) पाथर्डी तालुक्यातील भारजवडी या गावातील आत्महत्या केलेले कर्जबाजारी शेतकरी मल्हारी बटुळे यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी भाजपाच्यावतीने आत्महत्याग्रस्त बटुळे कुटुंबियांना एक लाखाची मदत दरेकर यांनी सूपूर्द केली व बटुळे यांच्या तिन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी देखील भाजपा उचलणार असल्याचेही, दरेकर यांनी यावेळी सांगितले. याचबरोबर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार संवदेनाहीन असून सरकारची सरसकट कर्जमाफीची घोषणा फसवी असल्याची टीका देखील दरेकर यांनी केली.

मल्हारी बटुळे यांनी काल रात्री कर्जबाजारीपणास कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर विरोधीपक्ष नेते दरेकर यांनी बटुळे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. बटुळे यांच्या पत्नीसाठी शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही दरेकर यांनी सांगितले. यावेळी आमदार मोनिका राजळे यांनीही बटुळे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
महाविकास आघीडी सरकारवर टीका करतान दरेकर म्हणाले, हे सरकार संवेदनाहीन सरकार असून राज्यातील बळीराजा कर्जामुळे आत्महत्या करीत आहे, पण या सरकारला व त्या सरकारमधील मंत्र्यांना त्याचे काही देणंघेणं नाही. २४ तास उलटूनही सरकारमधील कृषी मंत्री, पालकमंत्री किंवा एकही मंत्री बळीराजाच्या कुटुंबियांची भेट घेण्यास आलेला नाही. यामध्येच सरकारची शेतक-यासाठी असलेली अनास्था दिसून येते.

महाविकास आघाडी सरकारने घोषित केलेली सरसकट कर्जमाफी फसवी आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे काहीही भले झालेले नाही. सरकारने बळीराजाला सरसकट कर्जमाफी दिली असती, तर आज या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला नसता, अशी खंतही दरेकर यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 4:35 pm

Web Title: bjp will pay for education of three children of that farmer darekarmsr 87
Next Stories
1 आई संपादक झाली…आदित्य ठाकरे म्हणतात..
2 अजित पवारांचा गयारामांना टोला : “पदं घेतली अन् तिकडं तडफडली…”
3 राज ठाकरे करणार भाजपाशी युती? आशिष शेलार यांच्या भेटीने पुन्हा चर्चांना उधाण
Just Now!
X