News Flash

BJP Won in Bhandara Gondiya Election: भंडारा गोंदियामध्ये भाजपचे परिणय फुके विजयी, प्रफुल्ल पटेलांविरोधात भाजपला काँग्रेसची साथ

भंडारा गोंदियामध्ये प्रफुल्ल पटेल यांना हादरा बसला आहे.

भंडारा गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांच्या वर्चस्वाला हादरा.

भंडारा-गोंदिया विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला हादरा बसला आहे. या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार परिणय फुके यांचा विजय झाला असून प्रफुल्ल  पटेलांना हादरा देण्यासाठी काँग्रेस आणि भाजपची हातमिळवणी झाल्याची चर्चा आता रंगली आहे.

विधान परिषद निवडणुकीत भंडारा गोंदिया मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राजेंद्र जैन,भाजपतर्फे परिणय फुके आणि काँग्रेसतर्फे प्रफुल्ल अग्रवाल निवडणुकीच्या रिंगणात होते. भंडारा गोंदिया मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा बालेकिल्ला समजला जातो. या भागातील बहुसंख्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आहे. राष्ट्रवादीने विद्यमान आमदार राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली होती. कागदावरील आकडेवारी बघता राष्ट्रवादी मजबूत स्थितीत होती. तर भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू साथीदार परिणय फुके यांना उमेदवारी दिली होती. फुके हे यापूर्वी अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. गेल्या वर्षीच फुके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. फुके यांना उमेदवारी दिल्याने मुख्यमंत्र्यांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये हातमिळवणी होण्याची शक्यता होती. मंगळवारी मतमोजणीतून यावर अप्रत्यक्षपणे शिक्कामोर्तबच झाले आहे. भाजपच्या परिणय फुके यांनी राष्ट्रवादीच्या राजेंद्र जैन यांचा पराभव केला आहे. काँग्रेसच्या मतदारांनी दोन नंबरची मत भाजप उमेदवाराला दिल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. विशेष म्हणजे भंडारा – गोंदियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असतानाही परिणय फुके यांचा विजय झाला आहे. त्यामुळे भंडा-यात मुख्यमंत्र्यांनी पटेलांना शह दिल्याचे चित्र दिसत आहे. या मतदार संघात दुस-यांदा काँग्रेस आणि भाजप एकत्र आले आहे. यापूर्वी   जिल्हा परिषदेच्या धर्तीवरच या निवडणुकीतही काँग्रेस अखेरच्या टप्प्यात भाजपच्या पदरात मत टाकून राष्ट्रवादीला धक्का दिला होता.

भंडारा गोदिंयाचा निकाल

परिणय फुके – २१९

राजेंद्र जैन – १३८

प्रफुल्ल अग्रवाल – ११२

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 11:26 am

Web Title: bjp won in bhandara gondiya election set back for praful patel
Next Stories
1 Legislative Council Election 2016: सांगली – साता-यात अजित पवारांना दणका, काँग्रेस विजयी
2 Vidhan Parishad election 2016 : विधानपरिषद निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी दोन जागांवर विजयी
3 ‘भाजप-सेनेची भीती दाखवून काँग्रेस-राष्ट्रवादी मते मागतात’
Just Now!
X