02 March 2021

News Flash

विधानसभेसाठी भाजपाची तयारी सुरू; 21 जुलैला महत्त्वपूर्ण बैठक

राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

21 जुलै रोजी भाजपाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडेल. मुंबतील गोरेगाव येथे असलेल्या नेस्को संकुलात राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडेल.

राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर गोरेगावातील नेस्को संकुलात राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्यभरातील भाजपाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचीही शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांच्या बैठकांना वेग आला आहे.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी राज्यात 220 पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता. लोकसभा निवडणुकीत राज्यात शिवसेना भाजपने एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र प्रचार करत राज्यातील 48 पैकी 41 जागांवर विजय मिळवला. आता आगामी विधानसभा निवडणुकीतही शिवसेना आणि भाजप एकत्र निवडणूक लढवणार असून 220 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवू, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केला होता. विधानसभा निवडणुकीत युतीला 220 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळाल्यास आश्चर्य वाटू नये, असेही त्यांनी नमूद केले होते. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप वेगवेगळे लढले होते. तरी भाजपाला 122 जागांवर तर शिवसेनेला 63 जागांवर यश मिळाले होते. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही प्रभाव दिसणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2019 11:40 am

Web Title: bjp working committee meeting on 21 july mumbai goregaon nesco ground cm devendra fadanvis vidhan sabha election jud 87
Next Stories
1 ‘चिखलफेक’ आंदोलन बाळासाहेब ठाकरेंना नक्की आवडलं असतं-नितेश राणे
2 कोयना धरण एकतृतीयांश भरले; प. महाराष्ट्रात सर्वत्र जोरदार पाऊस
3 लष्कराच्या सराव क्षेत्रातील स्फोटात दोन ठार
Just Now!
X