11 August 2020

News Flash

केजरीवाल – दमानियांविरुध्द भाजयुमोची पोलिसात तक्रार

भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात आम आदमी पक्षाने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर आता भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आम

| February 8, 2014 02:37 am

भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात आम आदमी पक्षाने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर आता भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्राच्या प्रभारी अंजली दमानिया यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.
आपमध्ये नुकताच प्रवेश केलेल्या जम्मू आनंद यांनी नितीन गडकरी यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर पक्षाने त्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून महत्त्व दिले नाही. मात्र, गेल्या काही दिवसात अरविंद केजरीवाल आणि अंजली दमानिया यांनी गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावून त्यांना बदनाम करणे सुरू केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 8, 2014 2:37 am

Web Title: bjp youth morcha launch complaint against kejriwal and anjali damania
Next Stories
1 कोल्हापुरात आजपासून स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन
2 ‘आप’चा ‘झाडू’ आता काँग्रेसच्या हातात- रामदेवबाबा
3 टोलविरोध तीव्र : कोल्हापुरातील महापौर, उपमहापौरांकडून शासकीय गाड्या परत
Just Now!
X