20 January 2018

News Flash

भाजपचं सरकार आल्यावर कुठं जाल? नितीन गडकरींची आयकर विभागाला धमकी?

अध्यक्षपदावर दुस-यांदा विराजमान होण्याच्या काही तासांपूर्वी आयकर विभागाने घातलेल्या छाप्यांमुळे अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घ्यावी लागणा-या नितीन गडकरींचे आक्रमक रूप आज (गुरूवार) नागपूरमध्ये पहायला मिळाले. कॉंग्रेसने

नागपूर | Updated: January 24, 2013 1:31 AM

अध्यक्षपदावर दुस-यांदा विराजमान होण्याच्या काही तासांपूर्वी आयकर विभागाने घातलेल्या छाप्यांमुळे अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घ्यावी लागणा-या नितीन गडकरींचे आक्रमक रूप आज (गुरूवार) नागपूरमध्ये पहायला मिळाले. कॉंग्रेसने आयकर विभागाला हाताशी धरून माझ्याविरोधात षडयंत्र केले असल्याचा अरोप त्यांनी येथे बोलताना केला. एवढंच नव्हे तर भाजपचं सरकार आल्यावर कुठं जाल? असा इशारावजा धमकीही गडकरींची आयकर विभागाला दिली. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर पहिल्यांदाच ते नागपूरमध्ये आले असताना कार्यकर्त्यांसमोर बोलत होते.
आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे असून आपण न थांबता संघर्ष करतच राहणार असल्याचेही गडकरी म्हणाले. आपल्या भाषणात गडकरींनी क़ॉंग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला. ते म्हणाले की, कॉंग्रेसमध्ये एक मालकीण, बाकीचे नोकर आहेत. कॉंग्रेसला या देशातून मुळासकट उखडून काढणार, असल्याचंही ते पुढे म्हणाले.

First Published on January 24, 2013 1:31 am

Web Title: bjps nitin gadkari threatens income tax dept officials in speech to supporters
  1. No Comments.