बेल्जियमच्या दाम्पत्याने पहिले छायाचित्र घेतले

जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या शिवणझरी येथील पाणवठय़ावर काळय़ा बिबटय़ाची नोंद घेण्यात आली आहे. बेल्जियम येथील दाम्पत्याने या काळय़ा बिबटय़ाचे छायाचित्र घेतल्यानंतर लगेच वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये देखील त्याचे दर्शन घडले.  २०१४ नंतर दुसऱ्यांदा ताडोबात काळा बिबट दिसल्याने कॅमेरा ट्रॅप लावून त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात यावर्षी उन्हाळय़ात वाघ तथा बिबटय़ा दर्शन देत असल्याने देश-विदेशातील पर्यटकांची गर्दी झाली आहे. बेल्जियम येथील ज्युलिएट डिकाएस्केटर व जेन फ्रॅकोईस हे दाम्पत्य मुलांसह ताडोबा प्रकल्पातील कोळसा प्रवेशद्वारालगतच्या स्वरासा रिसोर्ट येथे मुक्कामास आहेत. काल मंगळवारी जिप्सी चालक प्रफुल्ल येरमे, गाईड शालिक येरमे यांच्यासह जेन फ्रॅकोइस, ज्युलिएट डिकाएस्टेकर, येरनोटस व त्यांची मुले लीना, जिया, रूबी व्याघ्र भ्रमंतीसाठी जिप्सीतून निघाले. व्याघ्र सफारी सुरू असतानाच सायंकाळी शिवणझरी परिसरातील पाणवठय़ावर  त्यांना काळय़ा रंगाचा बिबटय़ा दृष्टीस पडला. काळा बिबटय़ा हा अतिशय दुर्मिळ असल्याने आणि महाराष्ट्रात या बिबटय़ाची कुठेच नोंद नसल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला. ताडोबात काळा बिबटय़ा आहे यावर कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हते. स्वत: ताडोबाचे उपवनसंरक्षक गोखले यांनीही काळा बिबटय़ा ताडोबात नाहीच अशी माहिती प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली. विशेष म्हणजे, कोळसा प्रवेशद्वारावरील वन अधिकाऱ्यांना देखील याची माहिती नव्हती. बेल्जियमच्या दाम्पत्यासोबतच स्वसारा रिसोर्टचे व्यवस्थापक रणजीत भंडारी यांनी वन विभागाला या घटनेची माहिती दिली. तसेच छायाचित्रही उपलब्ध करून दिले. दरम्यान, आज सकाळी ताडोबाचे क्षेत्र संचालक मुकुल त्रिवेदी यांनी ताडोबात जाऊन माहिती घेतली. शिवणझरी परिसरात कॅमेरा ट्रॅप लावून ठेवले. काही वेळातच या कॅमेरा ट्रॅपमध्ये बघितले असता त्यात काळय़ा बिबटय़ाचे अध्रे छायाचित्र आलेले दिसले.