News Flash

धक्कादायक! एकनाथ शिंदे यांची प्रतिमा लावून अघोरी जादूटोणा, दोन जण अटकेत

पुरोगामी महाराष्ट्राला हादरवून सोडणारी बातमी

– विजय राऊत 

महाराष्ट्र राज्यातील अघोरी जादूटोणा नरबळी वाढते प्रमाण लक्षात घेऊन शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व समुळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम २०१३ अमलात आणला. मात्र अजूनही या अघोरी जादूटोणा नरबळी प्रथा केल्या जातात. याच प्रथेचा प्रयोग तब्बल ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. जादूटोणा करणाऱ्यांना पालघर उप विभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथून अटक केली आहे.

विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याचे हेतूने शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होवून दुखापत करण्याकरिता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर करण्यात आला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोटो समोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू , सफेद कोंबडा यांचा वापर करून अघोरी जादूटोणा करणारे दोघांना स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली आहे, अटक केलेली इसम हे अस्या अघोरी जादूटोणा करून लोकांना फसवत असून त्यांच्याकडून पैसेही उकळत असल्याचे सांगितले जात आहे.

अटक केलेले कृष्णा बाळू कुरकुटे व संतोष मगरू वारडी यांच्यावर जव्हार पोलीस स्टेशन मध्ये फसवणूक व महाराष्ट्र नरबळी, अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अघोरी जादूटोणा करणारे सुत्रधारांचा अधिक तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2020 12:00 pm

Web Title: black magic eknath shindes thane palghar nck 90
Next Stories
1 अहंकारी म्हणणाऱ्या फडणवीसांना संजय राऊतांनी दिलं उत्तर; म्हणाले…
2 महाराष्ट्राचा सुपुत्र प्रदीप मांदळे यांना जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण
3 ठाणे-पालघर जिल्ह्य़ातील मच्छीमारांचा २२ कोटी रुपयांचा परतावा प्रलंबित
Just Now!
X