22 October 2020

News Flash

चांगली बायको मिळावी यासाठी नंदूरबारमध्ये जादूटोणा, तरुणाला विवस्त्र करुन पूजा

पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून एक आरोपी आणि मुख्य पुजाऱ्याला अटक करण्यात आली आहे

नंदूरबारमध्ये चांगली बायको मिळावी यासाठी जादूटोणा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून एक आरोपी आणि मुख्य पुजाऱ्याला अटक करण्यात आली आहे. आरोपींनी पैशांच्या हव्यासापोटी आणि चांगली बायको मिळावी यासाठी अघोरी पूजा केल्याचं तपासात समोर आलं आहे.

या अघोरी पुजेसाठी आरोपींनी परिसरातील काही तरुणांना सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न केला. तरुणांना कोणतीही कल्पना न देता हा प्रकार सुरु होता. आरोपींनी घरातच हा प्रकार सुरु केला होता. तरुणांपैकी एकाने आपल्याला विवस्त्र करुन पूजा केल्याचं कुटुंबियांना सांगितलं असता हा प्रकार उघडकीस आला. आरोपी नरबळी देण्याच्याही प्रयत्नात होते.

नंदूरबार शहर पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुजाऱ्यासह एकाला अटक करण्यात आली आहे. यासंबंधी पोलीस तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 1:24 pm

Web Title: black magic to get good wife in nandurbar
Next Stories
1 आंबेनळी घाटात दरड कोसळली, अनेक पर्यटक घाटात अडकले
2 पेट्रोल-डिझेलला सोन्याचा भाव, नाशिकमध्ये 80 लीटर डिझेल चोरीला
3 जिल्हा बँकांची मक्तेदारी मोडीत
Just Now!
X