स्वयंसेवींच्या प्रयत्नांना मोठे यश

मराठवाडय़ाबरोबरच विदर्भातील अमरावती, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांत मोठय़ा संख्येने आढळणारे काळवीट जैवविविधतेचे उत्तम उदाहरण आहे. मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गात होणारे बदल, गवताळ प्रदेशांची कमतरता यामुळे त्यांचा अधिवास संकटात आला आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यातील काही स्वयंसेवींनी काळविटांच्या संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांची संख्या जवळजवळ पाचपटीने वाढली आहे.

Increase in prices of fruits and vegetables due to decrease in arrivals
खिशावर आर्थिक ताण; पालेभाज्या, फळभाज्यांच्या दरात वाढ
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
Mukesh Ambani
जागतिक महाश्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी नवव्या स्थानी; देशातील धनाढ्याच्या संपत्तीत वर्षभरात ४१ टक्क्यांची वाढ
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था मूलभूत संकल्पना, परिशिष्टे आणि सरनामा

गोंदिया जिल्ह्यापासून १२ किलोमीटर अंतरावर आमगाव-गोरेगाव तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या दहेगावच्या (मानेगाव) जंगल परिसरातील काळवीट संवर्धनाचा प्रकल्प प्राणीप्रेमींसाठी अभ्यासाचा विषय ठरला आहे. २००५-२००६ पासून गोंदियातील ‘सेवा’ या संस्थेच्या स्वयंसेवींनी सर्वप्रथम काळविटांच्या संवर्धनासाठी पुढाकार घेतला. त्यासाठी त्यांनी अधिवास असणारी  चार ठिकाणे निवडली. तिथे वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने काळविटांसाठी आवश्यक गवत, पोषक वनस्पती आणि वृक्षांची लागवड करण्यात आली. पाण्यासाठी दोन सौरपंप लावण्यात आले. आमगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात निरीक्षण मनोरे लावले गेले. त्यामुळे कामावर देखरेख ठेवणे शक्य होत आहे. काळविटांची संख्या वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांची फळी उभारण्यात आली. शिकार रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी खबऱ्याची भूमिका बजावली. त्यामुळेच गेल्या १३ वर्षांत तिथे काळविटांची संख्या वाढली. दहेगाव-मानेगाव या एका क्षेत्रात काळविटांची संख्या १५ ते २० वरून १०० वर पोहोचली. जिल्ह्यातील पाचही प्रकल्पांच्या ठिकाणी मोठय़ा संख्येने काळवीट आहेत.

वन विभाग, ग्रामस्थांची साथ

महाराष्ट्रात सारस केवळ गोंदिया जिल्ह्यत शिल्लक आहे. त्यासाठी याच ‘सेवा’ संस्थेने सारस संवर्धन प्रकल्प हाती घेतला होता. पहिल्या दोन वर्षांत त्यांच्या प्रकल्पाचे सकारात्मक परिणाम दिसू लागल्यामुळे दीड ते दोन वर्षांनी त्यांनी काळवीट संवर्धनाचा प्रकल्प हाती घेतला. त्यांच्या या प्रकल्पाला वन विभाग, जिल्हा प्रशासन आणि विशेष म्हणजे, गावकऱ्यांनी दिलेली साथ मोलाची ठरली.

लांडग्यांची संख्याही वाढली

काळविटांच्या वाढत्या संख्येबरोबर या ठिकाणी कधीकाळी बोटावर मोजण्याइतकी असलेली लांडग्यांची संख्याही वाढली आहे. वाढलेली लांडग्यांची संख्या पाहून डेहराडूनच्या भारतीय वन्यजीव संस्थेचे संशोधक या ठिकाणी अभ्यासासाठी आले होते. फिक्कट गुलाबी रंगाच्या दुर्मीळ असणाऱ्या लांडग्याची नोंद याच परिसरात करण्यात आली.