News Flash

रत्नागिरीतील केमिकल कारखान्यात स्फोट, परिसरात धुराचे लोट

घरडा रासायनिक कारखान्यामध्ये झाला भीषण स्फोट

कारखान्यातील भट्टीमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा रासायनिक कारखान्यामध्ये गुरुवारी दुपारी भीषण स्फोट झाला. स्फोटामुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गापासून जवळच हा कारखाना असल्याने महामार्गावरूनही धुराचे लोट दिसत आहेत. प्राथमिक माहितीनुसार स्फोटात जीवितहानी झालेली नाही. पण कारखान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून, आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. कारखान्यातील भट्टीमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 2:06 pm

Web Title: blast in gharda chemical factory in ratnagiri
Next Stories
1 औरंगाबादमधील शस्त्रसाठाप्रकरणी अबु जुंदालसह ११ दोषी
2 कोल्हापूरमध्ये हद्दवाढीच्या समर्थनार्थ कडकडीत बंद, रिक्षांची तोडफोड
3 ज्येष्ठ अभिनेते नंदू पोळ यांचे निधन
Just Now!
X