News Flash

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सात दिवस ‘ब्लॉक’, जाणून घ्या वेळापत्रक

धोकादायक दरडींचे काम करण्यासाठी घेण्यात येणार ब्लॉक

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सात दिवस ‘ब्लॉक’, जाणून घ्या वेळापत्रक

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर सात दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे. तळेगाव टोलनाका ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ला जोडणाऱ्या मार्गिकेवरील धोकादायक दरडींचे काम करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. धोकादायक दरडींचे काम करण्यासाठी १४ मे ते १७ मे आणि २१ मे ते २३ मे दरम्यान हा ब्लॉक असेल.

कसा असेल ब्लॉक –
ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत दरतासाला १५ मिनिटांकरिता वाहतूक बंद करण्यात येणार आहे. यावेळी एकूण ६ ब्लॉक असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी महामार्ग पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तो ब्लॉक पुढील प्रमाणे असेल.

वेळ –
ब्लॉक १- १०.०० ते १०.१५, ब्लॉक २ – ११.०० ते ११.१५, ब्लॉक ३ – १२.०० ते १२.१५, ब्लॉक ४ – २.०० ते २.१५, ब्लॉक ५ – ३.०० ते ३.१५ आणि ब्लॉक ६ – ४.०० ते ४.१५ या दरम्यान १५ मिनिटांचा ब्लॉक.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2019 12:13 pm

Web Title: block on mumbai pune expressway 2
Next Stories
1 तू हसू नको; पाणी प्रश्नावरुन काँग्रेस आमदाराने केली अधिकाऱ्याला शिवीगाळ
2 ५० हजार रुपये गुंतवा, व्याजस्वरुपात मिळवा घरपोच हापूस आंबे
3 नेवासे ऑनर किलिंग: प्रतिभाची हत्याच; पोलिसांचा न्यायालयात दावा
Just Now!
X