News Flash

वादळीवाऱ्याचा फटक्यामुळे बोटींचे नुकसान

रविवारी मध्यरात्रीपासून वादळी वारे, रिमझिम पाऊस यासह समुद्रात मोठं मोठ्या लाटा उसळण्यास सुरूवात झाली होती.

वसई : अर्नाळा किल्ल्यातील समुद्र किनाऱ्यावर मच्छीमार  बांधवांनी बोटी नांगरून ठेवल्या होत्या. मात्र रविवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह धडकलेल्या मोठं मोठ्या लाटां व वादळीमुळे बोटींचे दोर तुटून बोटी थेट किनाऱ्यावर आदळून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

भारतीय हवामान खात्याने कोकण किनारपट्टीच्या भागात येत्या दोन चार दिवसात तौक्ते  चक्रीवादळ येण्याचा इशारा देण्यात आला होता. या चक्रीवादळाच्या इशाऱ्यामुळे  वसईतील खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांच्या बोटी शनिवारी समुद्र किनाऱ्यावर नांगरून ठेवल्या होत्या.

रविवारी मध्यरात्रीपासून वादळी वारे, रिमझिम पाऊस यासह समुद्रात मोठं मोठ्या लाटा उसळण्यास सुरूवात झाली होती. या लाटांचा व वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की समुद्र किनाऱ्यावर मच्छिमार बांधवांनी नांगरून ठेवलेल्या बोटींचे दोर तुटून गेले. आणि या बोटी किनाऱ्यावर जोराने आदळून गेल्याने बोटींचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही एकदिवसीय मासेमारी साठी जाणाऱ्याबोटीही अक्षरश: तुटून त्यांचे दोन तुकडे झाले आहेत.तर काही बोटी एकमेकांवर खडकावर आदळून गेल्याने बोटींना मोठं मोठी छिद्र पडल्याचे चित्र दिसून येत आहे. तर काही बोटींचे इंजिनही निखळून पडले आहे.

अर्नाळा किल्ला परिसरात मोठ्या संख्येने मच्छिमार बांधव राहत आहेत. यातील काही मच्छिमार लांबच्या पल्याला मासेमारीसाठी जातात तर काही बांधव हे आपल्या छोट्या बोटी घेऊन एकदिवसीय मासेमारी जातात त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मात्र नुकताच घोंगावलेल्या वादळामुळे अनेकांच्या बोटींचे नुकसान होऊन मोठा आर्थिक फटका बसला आहे.

पालघर टेंभी येथील मासेमारी नौका बुडाली

पालघर; पालघर तालुक्यातील माहीम टेंभी येथील मच्छीमारांना बोटी सुरक्षित ठेवण्यासाठी खाडी किंवा बंदर नसल्याने एका सिलिंडरची मच्छिमारी बोट केळवे समुद्र किनाऱ्यावर नेऊन ठेवण्यात आली होती. तुफानी वादळात ही बोट बुडाल्याची माहिती स्थानिक मच्छीमारांकडून प्राप्त झाली आहे. दरम्यान केळवे किनाऱ्याची पाहणी पालघरचे पोलीस अधीक्षक यांनी वादळापूर्वी केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 12:45 am

Web Title: boat damage due to storm surge akp 94
Next Stories
1 पालघर, वसईच्या किनारपट्टी भागाला फटका
2 सहा घरांचे पत्रे उडाल्याने संसार उघड्यावर
3 करोनाकाळात लग्नसमारंभात हाणामारी
Just Now!
X