यवतमाळमध्ये सोशल मीडियावर फिरण्याऱ्या एका जाहिरातीने अनेक बेरोजगार तरुणांचं लक्ष वेधून घेतलं होतं. जिल्हा आरोग्य विभागात पदांची भरती आहे असं त्या जाहिरातीत नमूद करण्यात आलं होतं. त्यानंतर इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी धाव घेतली. मात्र ही जाहिरात बोगस असल्याचं स्पष्ट झाल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पदभरतीची जाहिरात बोगस असल्याचे खुद्द जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनी सांगितलं. तसेच शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

यवतमाळ जिल्हा आरोग्य विभागात ४६ पदांची सरळसेवेने भरती करण्यात येत असल्याची एक जाहिरात दोन दिवसांपासून समाजमाध्यमांवर फिरत आहे. शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता वैद्यकीय अधिकारी पद १, स्टाफ नर्स ६ जागा, आरोग्य सेवक २६, एएनएम ७, औषधी निर्माता ५ व लॅप टेक्नीशियन १ या रिक्त पदांच्या सरळसेवा पद्धतीने भरण्यात येतील. बोगस भरतीबाबतची जाहीरात १६ मेपासून समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. त्यामुळे अनेकांनी नोकरीच्या आशेने जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात धाव घेतली. तसेच जाहिरातीसंदर्भात माहिती घेण्यासाठी गर्दी केली. मात्र ही जाहिरात बोगस असल्याचं निदर्शनास आलं.

“लसनिर्मिती प्रकल्प कुठेही झाला तर आनंदच”; अजित पवारांनी टोचले भाजपा आमदाराचे कान

“खोटी जाहिरात प्रसिद्ध करून दिशाभूल करणाऱ्यांचा शोध घ्यावा तसेच चौकशी करून कारवाई करावी”, अशी मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरि पवार यांनी पोलिसांकडे केली आहे.

यवतमाळ : ‘म्युकरमायकोसिस’ग्रस्त रूग्णाचा मृत्यू ; अन्य ११ रूग्ण असल्याने चिंता वाढली!

बेरोजगारांची दिशाभूल करणारी ही जाहिरात असून भविष्यात अनुचित प्रकारास वाव देणारी आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टवर लगेच विश्वास ठेवू नका असं आवाहनही करण्यात आलं आहे.