22 January 2021

News Flash

वीज नसल्याचे कारण देत उपचारास नकार

बोईसर ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

(संग्रहित छायाचित्र)

करोनाकाळात बोईसरमधील आरोग्य व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वसामान्य रुग्णांना दुखापत तसेच आजारांवरील उपचारांसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. बोईसर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी शुक्रवारी वीज नसल्याचे कारण पुढे करीत एका जखमीवर उपचार करण्यास नकार दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

बोईसर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर आणि काही कर्मचारी कंटाळून निघून गेल्याच्या मध्यंतरी घटना घडल्या आहेत. रुग्णालयात मूलभूत सुविधा नसल्याने रुग्णांना ताटकळत उभे राहावे लागते.

शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास  मुकेश कुमार (२२) याला दुचाकी अपघातात पायाला दुखापत झाली. यासाठी त्याला बोईसर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. मात्र, वीज नसल्याचे कारण देत डॉक्टर स्नेहा जाधव यांनी प्राथमिक उपचार करण्यास नकार दिला.

तासभर ताटकळत उभ्या असलेल्या मुकेशला त्रास होऊ लागल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला बोईसरमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

या प्रकरणी बोईसर ग्रामीण रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी राजेंद्र केळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत तातडीने उपचार करण्यासाठी सांगतो असे उत्तर दिले. परंतु त्यानंतरदेखील या तरुणावर उपचार झाले नसल्याचा प्रकार समोर आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 12:38 am

Web Title: boisar rural hospital refuse treatment on the grounds of lack of electricity abn 97
Next Stories
1 करोनाकाळात उदरनिर्वाहासाठी ‘जोडव्यवसाया’ची परंपरा
2 पालिकेचे कामण विभागीय कार्यालय जीर्णावस्थेत
3 भाईंदरमध्ये करोनामुक्तीचा दर ८८ टक्के
Just Now!
X