“एक अभिनेत्री असल्याचा, मराठी असल्याचा मी त्रास सहन केला आहे, मी अनेक गोष्टी भोगल्या आहेत. मी त्यावेळी नेपोटिझमबद्दल बोलले नाही. मात्र आत्ता मी या सगळ्या गोष्टी बोलते आहे. त्यावेळी मराठी लोकांना चित्रपटसृष्टीत घाटी असंही संबोधलं जात होतं,” अशी खंत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केली. एबीपी माझावर आयोजित करण्यात आलेल्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात त्या सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

आणखी वाचा- “कंगनाने हिमाचल प्रदेशमधून ड्रग्सविरोधातील लढा सुरू करावा”; उर्मिला मातोंडकरांचा सल्ला

amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
Devendra Fadnavis after Swatantrya Veer Savarkar
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट पाहिल्यानंतर फडणवीसांची राहुल गांधींसाठी खास ऑफर; म्हणाले, “मी माझ्या खर्चाने…”
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
Loksatta kutuhal Use of artificial intelligence in film
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेची चित्रपटातील बीजे

हिंदी सिनेसृष्टीत घराणेशाही ही चंद्र आणि सूर्याइतकीच लख्ख आहे असं अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं. कंगना रणौतने बॉलिवूडमधल्या घराणेशाहीविरोधात आवाज उठवला त्याबद्दल काय मत आहे असा प्रश्न उर्मिला मातोंडकर यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी या प्रकरणावर भाष्य करताना घराणेशाही असल्याचं नमूद केलं.  ९० च्या दशकात १५ ते १६ अभिनेत्री माझ्यासोबत आल्या होत्या. त्यातल्या ११ ते १२ नट्या या कुणाच्या ना कुणाच्या नात्यात होत्या. त्यामुळे घराणेशाही किंवा नेपोटेझिम हे आज आलेलं नाही. ते अनेक वर्षांपासून आहे. हे फक्त बॉलिवूडमध्येच नाही. तर प्रत्येक क्षेत्रात आहे असंही त्या म्हणाल्या.

आणखी वाचा- काँग्रेस का सोडली? उर्मिला मातोंडकरने सांगितलं कारण; जाहीर केली नाराजी

नेपोटिझम पूर्वीपासूनच

“रंगीला हा सिनेमा मी केला तेव्हा अनेकांना वाटलं की मी त्यात अभिनय केलाच नाही मी फक्त छोटे कपडे घालून नाचले. अनेक लोकांनी त्यावेळी असाच समज करुन घेतला होता. एका प्रख्यात मराठी दिग्दर्शकानेही मी त्यांचा चित्रपट नाकारल्याने माझ्यावर टीका केली. त्या काळात सोशल मीडिया नव्हता. नेपोटिझम हा खूप काळापासून आहे. सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली ही दुर्दैवी बाब आहे. मी त्यानंतर जे ट्विट केलं होतं त्यात पहिला शब्द नेपोटिझम होता. सुशांत सिंह राजपूत हा एक चांगला अभिनेता होता. त्याच्या मृत्यूनंतर जो काही तमाशा केला जातो आहे तो दुर्दैवी आहे,” असंही उर्मिला मातोंडकर यांनी म्हटलं.