30 May 2020

News Flash

विसापूरचे ‘बॉटनिकल गार्डन’ देशात सर्वोत्तम बनेल – मुनगंटीवार

वनस्पती शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यासाठी विसापूर खुले विद्यापीठ असेल

सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री

विसापूर येथे तयार करण्यात येणारे बॉटनिकल गार्डन हे देशातील सर्वात उत्तम गार्डन होणार असून वनस्पती शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यासाठी विसापूर खुले विद्यापीठ असेल, असे मत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
बल्लारपूर मार्गावर असलेल्या विसापूर येथे बंगळुरूच्या धर्तीवर निर्माण करण्यात येणाऱ्या बॉटनिकल गार्डनच्या संरक्षण भिंतीचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. वनविकास मंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल हे अध्यक्षस्थानी होते. मुख्य वनसंरक्षक तथा उपमहासंचालक सामाजिक वनीकरण महिप गुृप्ता, अधीाक्षक अभियंता डी.के.बालपांडे, उपसंचालक सामाजिक वनीकरण डी.आर.काळे व कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ७ कोटी रुपये खर्च करून ही संरक्षण भिंत बांधण्यात येत असून २५० हेक्टरवर बॉटनिकल गार्डन निर्माण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विसापूर येथील युवकांना मोठय़ा प्रमाणात रोजगार प्राप्त होणार आहे. बॉटनिकल गार्डनला भेट देण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येतील. तीन वर्षांत उद्याण पूर्ण करण्यात येणार आहे. विसापूरजवळ सैनिकी शाळा उभारण्यात होणार असून सैनिकी शाळेमुळे विसापूरची अर्थव्यवस्था बदलणार आहे. विसापुरला आपण विविध विकास कामे केली असून येथील चित्र बदलणार आहे. १९९५ पासून विसापूरची जनता आपल्या पाठीशी उभी राहली आहे. म्हणून विसापूरचा विकास करणे माझे कर्तव्य आहे. रस्तासाठी २० लाख रुपये मंजूर केले. स्मशान भूमी रस्ताही मंजूर केला. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून विसापूरच्या विकासाचा आराखडा तयार करीत आहोत.
येथील शेतकऱ्यांच्या शेतात विहीर खोदण्याची योजना राबवली जाणार आहे. आरोग्य केंद्र या पेक्षाही उत्तम करणार व सर्व साहित्य देणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते पार पडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2016 3:25 am

Web Title: botanical garden sudhir mungantiwar
Next Stories
1 राज्यात अवकाळी पाऊस; वीज कोसळून ३ मृत्यूमुखी
2 अश्विनी भिडे-देशपांडे यांचे ‘आम्ही रसिक’मध्ये गायन
3 विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील ‘स्कायवॉक’ला पालिकेची नोटीस
Just Now!
X