24 October 2020

News Flash

Video : देव तारी…अंगावरुन गाडी जाऊनही मुलगा सुखरुप

अंगावरुन गाडी जाऊनही हा मुलगा सुखरुप आहे. इतकेच नाही तर गाडी निघून गेल्यानंतर तो मुलगा खेळण्यासाठी पुन्हा धावत असल्याचेही त्यामध्ये दिसते.

गल्लीत फुटबॉल किंवा आणखी काही खेळणारी मुले आपण नेहमीच पाहतो. या मुलांना अनेकदा खेळताना वेळेचेही भान राहत नाही. नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडियोमध्ये आपला हृदयाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. या व्हिडियोमध्ये एका लहान मुलाच्या अंगावरुन चारचाकी गाडी जाताना दिसत आहे. आणि अंगावरुन गाडी जाऊनही हा मुलगा सुखरुप आहे. इतकेच नाही तर गाडी निघून गेल्यानंतर तो मुलगा खेळण्यासाठी पुन्हा धावत असल्याचेही त्यामध्ये दिसते. ही नेमकी कुठे घडली याबाबत अद्याप माहिती मिळाली नसून त्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडियोमध्ये अनेक लहान मुले फुटबॉल खेळताना दिसत आहेत. यावेळी रस्त्याच्या बाजूला लावलेली कार एक महिला काढत होती. खेळणाऱ्या एका लहान मुलाच्या बुटाची लेस सुटल्याने तो खेळातून बाजूला येऊन आपल्या बुटाची लेस बांधत होता. नेमकी त्याचवेळी महिलेने कार सुरु केली. यावेळी कारच्या अगदी जवळ बसलेला मुलगा या महिलेला न दिसल्याने तिने थेट कार रस्त्यावर काढली. यावेळी मुलगा गाडीखाली आल्याचे व्हिडियोमध्ये दिसत आहे. हा मुलगा गाडीखाली आल्याचे व्हिडियोमध्ये दिसल्यावर आपल्या सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकतो. मात्र कार पुढे गेल्यावर हा मुलगा सुखरुप असल्याचे दिसते.

इतकेच नाही तर गाडीखाली आलेला हा मुलगा गाडी पुढे गेल्यावर खेळण्यासाठी पुढे धावताना दिसत आहे. काळजाचा ठोका चुकवणारा हा क्षण असला तरीही या लहान मुलाला मात्र त्याचे अजिबात गांभीर्य नसल्याचे दिसते. बाकी काहीही म्हणा पण या मुलाचे दैव बलवत्तर आहे असेच म्हणावे लागेल. पण अशाप्रकारे रस्त्यावर खेळणाऱ्या मुलांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच पालकांनीही त्यांच्याकडे योग्य तितके लक्ष देणे गरजेचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2018 5:46 pm

Web Title: boy is safe after rolled down by car
Next Stories
1 मुंबईत मोबाइल चोरणाऱ्या दिल्लीतील टोळीचा पर्दाफाश, दोघांना अटक
2 हिंगोलीत दीड वर्षांच्या मुलासह विहिरीत उडी मारुन महिलेची आत्महत्या
3 वारिस पठाण दुसऱ्या देशात असते तर काय झाले असते: नितेश राणे
Just Now!
X