News Flash

कोल्हापूर – वहिनीला त्रास देणाऱ्या भावाची डोक्यात दगड घालून हत्या

कोल्हापुरात तरुणाने सख्ख्या भावाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे

कोल्हापुरात तरुणाने सख्ख्या भावाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. इचलकरंजीतील लंगोटे मळ्यात ही घटना घडली. गुरुवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही हत्या करण्यात आली. वहिनीला घरगुती वादातून सतत त्रास देत असल्याच्या रागातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे.

नितीन सुभाष मगदूम (३६) असं हत्या झालेल्या व्यक्तीटं नाव आहे. संशयित आरोपीचं नाव सचिन सुभाष मगदूम (वय २३,रा. यद्राव ,ता.शिरोळ) असं आहे. सुमन नितीन मगदूम (२८ रा. लंगोटे मळा) हिने यासंबंधी शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

नितीन आणि सुमन या दोघा पती पत्नींमध्ये सतत वाद होत असत. ब्युटीपार्लरचे काम करणाऱ्या सुमनकडे नितीन पैशांसाठी तगादा लावत असे. गुरुवारी रात्री आठ वाजता असाच वाद झाला. नितीन याने पत्नीला मारहाण करून घरातील साहित्य विस्कटून टाकले. त्यानंतर त्याचा भाऊ सचिन याने भांडण झाल्याप्रकरणी जाब विचारला. .यामुळे दोघांत पुन्हा वादावादी झाली. हा वाद अखेर शेजारच्या एका व्यक्तीने मिटवला.

रात्री नितीन अंकुर अग्रवाल यांच्या घरासमोर झोपला होता. दीड वाजण्याच्या सुमारास सचिन हा नितीन झोपलेल्या ठिकाणी आला. वाद घातल्याचा संताप आणि वहिनीला त्रास देत असल्या कारणाने सचिन याने तेथील दगड उचलून नितीन याच्या डोक्यात घातला. झोपेत असताना अचान झालेल्या या हल्ल्यात नितीनचा जागीच मृत्यू झाला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

हत्या केल्यानंतर सचिनने पळ काढला होता. पण पोलिसांनी कसून तपास करून त्याला तीन तासात ताब्यात घेतले असे शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक आय.एस. पाटील यांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 10:42 am

Web Title: brother murder in kolhpuar
Next Stories
1 आला दसरा पानं तोडणं विसरा..!
2 कोल्हापूर महापालिका सभेत महावितरण, विद्युत विभागाच्या कामांवर वादळी चर्चा
3 अखेर आजपासून कोल्हापुरात कामगार विमा योजनेंतर्गत रुग्णालय सुरू
Just Now!
X