मूल शहराजवळ असलेल्या चंद्रपूर मार्गावरील टेकडीवर स्थापीत केलेली तथागत गौतम बुद्धाची मूर्ती अज्ञात समाजकंटकानी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी २० ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६ च्या सुमारास भन्ते संघवंश सांयम वंदने करीता गेले असता त्याठिकाणी भगवान गौतम बुद्धाची मूर्ती नसल्याचे दिसून आले. त्यांनी बुद्धगिरीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना तात्काळ यासंबंधी माहिती दिली. पोलिसांत यासंबंधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेमुळे मूल शहरातील बौद्ध बांधवांकडून समाजकंटकांचा निषेध करण्यात येत आहे. परिस्थिती चिघळू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे .

मूल शहराला लागून टेकडी आहे. अनेक वर्षापुर्वी या टेकडीवर बुद्धाचे पुरातन शिल्प म्हणजेच बुद्ध मूर्ती आढळली. ही बुद्धमुर्ती तिथे अनेक वर्षापासुन असून त्या ठिकाणी दरवर्षी मोठे उत्सव साजरे होतात. या ठिकाणी उत्सवात मोठे यात्रेचे स्वरुप प्राप्त होते. महाराष्ट्रातील जिल्ह्या-जिल्ह्यातून बौद्ध उपासक-उपासिका या ठिकाणी बुद्धाला वंदन करण्यास येतात. चंद्रपूर जिल्ह्यातील बौद्ध बांधवाचे हे मोठे वंदन स्थळ आहे.

Who holds the keys to the ancient treasures of Tuljabhavani Devi temple
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पुरातन खजिन्याच्या चाव्या कोणाकडे?
chhattisgarh s Elephant Family, Settles in Maharashtra, female elephant, give birth to calf, gadchiroli district , gadchiroli elephant born, elephant news, gadchiroli news, marathi news, animal news,
VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…
dharashiv, tulja bhavani
तुळजाभवानी देवीचे दागिने चोरणारे फरारच! प्रमुख तीन संशयितांची नार्को टेस्ट करा : गंगणे
In Ralegaon taluka a young man and an old man were killed in Nepal
राळेगाव तालुक्यात रक्तरंजीत होळी; नेपाळच्या तरुणासह वृद्धाची हत्या

परंतु काही समाजकंटकाच्या माध्यमातून मंगळवारी रात्री पुरातन असलेलं शिल्प म्हणजेच बुद्ध मर्ती चोरण्याचं कटकारस्थान करुन बुद्ध मुर्ती चोरण्यात आली आहे. यातून संमाजकंटकाकडून करण्यात आल्याचा कृत्याचा बुद्ध टेकडीवर एकत्र येऊन निषेध केला जात आहे. दरम्यान जिल्ह्याचे पालकमंञी सुधीर मुनगंटीवार यांनी सदर प्रकाराचा निषेध नोंदवला असुन ज्या कोणी समाजकंटकाने हा प्रकार केला त्याचा शोध लावून योग्य शासन करावे असा आदेश पोलिसांना दिला आहे.