News Flash

सिंधुदुर्गमध्ये जमीन व्यवहारात बिल्डरांना फायदा; घरमालक तोटय़ात

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बिल्डर्स, डेव्हलपर्स व जमीन खरेदी-विक्रीमुळे भाडोत्री व कुळांना फायदेच फायदे होत आहेत. मात्र जमीनमालक किंवा घरमालकांना तोटाच सहन करण्याची पाळी आली आहे,

| July 7, 2013 03:23 am

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बिल्डर्स, डेव्हलपर्स व जमीन खरेदी-विक्रीमुळे भाडोत्री व कुळांना फायदेच फायदे होत आहेत. मात्र जमीनमालक किंवा घरमालकांना तोटाच सहन करण्याची पाळी आली आहे, असे बोलले जाते. सिंधुदुर्गमध्ये बिल्डर्स व डेव्हलपर्सनी घरे किंवा जमिनी घेऊन घरबांधणी तसेच फळझाड लागवड किंवा प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेऊन जमीन खरेदी-विक्रीला प्राधान्य दिले आहे.
जमिनीत असणाऱ्या घरात भाडोत्री असतील तर त्यांच्याशी बिल्डर्स व डेव्हलपर्सना चर्चा करावी लागते. त्यांना घर रिकामे करण्यासाठी विकसित दुकान किंवा निवासी फ्लॅट, रोख कॅश व इमारत बांधकाम होईपर्यंतचे भाडे द्यावे लागते. तसेच कुळालाही रोख कॅश देऊन त्याच्या हक्काला प्रतिसाद द्यावा लागत आहे.
जमीनमालक व घरमालकांना मात्र भाडोत्री किंवा कुळासारखा फायदा होत नाही. मालकांना दरवर्षी देखभाल खर्च करावा लागतो, पण भाडोत्री किंवा कुळांना कोणताही खर्च करावा लागत नाही. फायदाच फायदा होत असल्याची चर्चा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात सिमेंट-काँक्रीटचे जंगल वाढत असून जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तेजीत आहेत. त्याचा फायदा भाडोत्री व कुळांनाच होत असल्याचे बोलले जाते. मुंबई, कोल्हापूरसारख्या शहरांचे दर या ठिकाणी असल्याचे आढळून येतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 3:23 am

Web Title: builders in air land owners faces loss
टॅग : Builders
Next Stories
1 सहा ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीत राष्ट्रवादी पक्षाची सरशी
2 विहिरीत बुडून दोन मुलींचा मृत्यू
3 सिंधुदुर्ग नूतन जिल्हाधिकारीपदी ई. रवींद्रन
Just Now!
X