20 September 2020

News Flash

अकोल्यात इमारत कोसळली, महिला ठार ; 3 जखमी

चोपडे यांचे कुटुंबीय भोजन केल्यानंतर घरात बसले होते...

अकोल्यात एक इमारत कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय. तर मृत महिलेच्या कुटुंबातीलच अन्य तीन जण जखमी झालेत. मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान तेलीपुरा चौकामध्ये ही घटना घडली.

या इमारतीखाली चोपडे कुटुंबातील कल्पना चोपडे, मंगेश चोपडे ,सुनीता चोपडे आणि योगेश चोपडे हे चारही सदस्य ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. तेलीपुरा चौकामध्ये जानकी रामजी चोपडे यांचे यांचे कुटुंबीय वास्तव्यास आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी कल्पना चोपडे, मोठा मुलगा मंगेश चोपडे, त्यांची पत्नी सुनीता चोपडे व लहान भाऊ योगेश चोपडे हे राहतात. रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान जानकीराम चोपडे यांचे कुटुंबीय भोजन केल्यानंतर घरात बसले होते. त्यावेळी अचानक जीर्ण झालेली तीन मजली इमारत अचानक कोसळली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी, पालिका कर्मचारी आणि आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसह परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेऊन बचाव कार्य सुरू केले. इमारत कोसळल्याची घटना घडताच काही वेळातच महापालिकेची जेसीबी घटनास्थळावर बोलावण्यात आली. मात्र कोसळलेली इमारत अरुंद जागेत असल्याने जेसीबी नेण्यास अडथळा निर्माण झाला. इतरांना ढिगाऱ्याखालून काढण्यात आलं मात्र, ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यासाठी तीन तासांहून अधिक वेळ लागल्याने कल्पना चोपडे यांचा मृत्यू झाला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 11:01 am

Web Title: building collapsed in akola one lady died
Next Stories
1 म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांना जीवे मारण्याची धमकी
2 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
3 राजकीय क्षेत्रातील गोंदियाचे जावई, मेहुणे सत्तेच्या शिखरावर!
Just Now!
X