News Flash

विरार येथे जुन्या इमारतीचा भाग कोसळला ; सुदैवाने जीवितहानी नाही

तळमजल्याच्या दुकानांचे नुकसान

विरार पूर्वेतील नारंगी बायपास रस्त्यावरील नाना अपार्टमेंट या चार मजली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली असून सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

विरार पूर्वेतील नारंगी बायपास रस्तालगत १३ वर्षे जुनी नाना अपार्टमेंट नावाची चार मजली इमारत आहे.या इमारतीमध्ये २ विंग असून सध्या स्थितीत या ठिकाणी २७ कुटुंब राहत आहेत. गुरुवारी सकाळी अचानकपणे या इमारतीचा काही भाग कोसळून गेल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती वसई विरार महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत इमारतीमधील नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने बाहेर काढले. मात्र इमारतीचा सज्जा तळ मजल्यावर असलेल्या दुकानांवर कोसळल्याने दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवींतहानी झाली नाही. परंतु कमकुवत झालेल्या इमारतीमुळे इथल्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आधीच करोनाचे संकट त्यात इमारत कोसळण्याची घटना यामुळे नागरिकांनी अधिकच चिंता व्यक्त केली आहे.

वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात अशा अनेक जुन्या इमारती असून त्यात हजारो लोक राहात आहेत.या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 1:38 pm

Web Title: building part collapse in virar scsg 91
Next Stories
1 गडचिरोली : दोन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश
2 “सरकारबद्दल चांगलं लिहावं म्हणून सेना भवनातून सेलिब्रिटींना पैसे जातात”; नितेश राणेंचा खळबळजनक आरोप
3 Maharashtra Lockdown: …अन्यथा महाराष्ट्रात प्रवेश नाही; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
Just Now!
X