19 September 2020

News Flash

कर्जमाफी मिळत नसल्याने दाम्पत्याची आत्महत्या

राज्य सरकारकडून कर्जमाफी जाहीर झाली असली तरी प्रत्यक्षात त्याचा लाभ सावळे दाम्पत्याला मिळाला नव्हता. त्यांचे कर्जमाफी मिळालेल्या लाभार्थ्यांचा यादीत नावही होते.

(संग्रहित छायाचित्र)

कर्जमाफी मिळत नसल्याने बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथील शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. घराशेजारील विहिरीत उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली. रमेश सावळे आणि विद्या सावळे असे या दाम्पत्याचे नाव आहे.

मोताळा येथे राहणारे शेतकरी रमेश सावळे आणि विद्या सावळे या दाम्पत्यावर कर्ज होते. राज्य सरकारकडून कर्जमाफी जाहीर झाली असली तरी प्रत्यक्षात त्याचा लाभ सावळे दाम्पत्याला मिळाला नव्हता. त्यांचे कर्जमाफी मिळालेल्या लाभार्थ्यांचा यादीत नावही होते. मात्र, कर्जमाफी झाले नव्हते. बँकेचे कर्ज डोक्यावर असल्याने ते दाम्पत्य तणावात होते. कर्जमाफी नाही आणि त्यामुळे नव्याने कर्जही मिळत नव्हते. या विवंचनेतून गुरुवारी रात्री साडे नऊच्या सुमारास सावळे दाम्पत्याने विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. या दाम्पयाला तीन वर्षांचा मुलगा देखील आहे. गावात त्यांची ३ एकर शेती होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2018 9:33 am

Web Title: buldhana debt ridden farmer couple commits suicide motala
Next Stories
1 जळगावमधून एक तरुण ताब्यात, एटीएसची कारवाई
2 एसटी महामंडळ खरेदी करणार ५०० नवीन बस
3 राम नव्हे ‘हराम’ कदम, विकृत भाजपाला उखडून फेका-शिवसेना
Just Now!
X