भारत-चीन सीमेवरील लडाख येथे चीनने केलेल्या कुरघोडीत भारताचे वीस जवान शहीद झाले. चीनच्या या कृत्याचा निषेध म्हणून भूमीपूत्र संघर्ष वाहिनीने आज चीनचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी युवकांनी शहिदांना श्रध्दांजली अर्पण केली.

सीमेवर दोन्ही सैनिकांमध्ये चकमक उडाली यात भारताचे वीस जवान वीरगतीस प्राप्त झाले. भारतीय सैन्याने सुध्दा चीनच्या ३५ सैनिकांना ठार करीत चोख प्रत्युत्तर दिले. चीनची ही प्रवृत्ती सत्तापिपासू असून जगाला वेठीस धरण्याचा हा प्रकार आहे. चीनच्या मुजोरीला आळा घालायचा असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनला एकटे पाडण्याची भूमिका जगाला घ्यावी लागेल, असे संघटनानेते अभिजीत फाळके म्हणाले.

यावेळी चीनच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. शिवाजी चौक परिसरात झालेल्या या पुतळादहन आंदोलनात युवक, महिला व माजी सैनिक उपस्थित होते.