News Flash

औरंगाबाद-पालघर बसला वाड्याजवळ अपघात चार जखमी

नाशिकहून वाडा या ठिकाणी जात होती बस

लोकसत्ता, वार्ताहर वाडा
औरंगाबाद-वाडा-पालघर या बसचा आज संध्याकाळी वाडा-नाशिक या राज्यमार्गावर आमले घाटामध्ये एका ट्रकने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात चार प्रवासी जखमी झाले आहेत. पालघर आगाराची औरंगाबाद-पालघर ही बस नाशिक येथून खोडाळा मार्गे वाडा येथे येत असताना या बसमध्ये व ट्रक मध्ये आंबला घाटामध्ये एका वळणावर समोरासमोर टक्कर झाली.

या मार्गावर वाहनांची वर्दळ अधिक प्रमाणात नसल्याने वाडा आगारातून जादा बस नेऊन अपघात ग्रस्त बसमधील प्रवाशांना पालघर पर्यंत सोडण्यात आले. जखमींवर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2020 11:36 pm

Web Title: bus accident at ambala ghat khodala scj 81
Next Stories
1 सुटी सिगारेट व बिडी विकायला महाराष्ट्रात बंदी!
2 करोना बाधित रुग्णाचा आरोग्यमंत्री राजेश टोपेंना भेटण्याचा प्रयत्न
3 आशा स्वयंसेविकांनी प्रस्तावित आंदोलन मागे घ्यावं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन
Just Now!
X