सुरगाणा (जि. नाशिक) तालुक्यातील बोरगावजवळील गायदर घाटात लक्झरी बस दरीत कोसळून ३ जण ठार तर २२ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये २ महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ती थेट दरीत जाऊन कोसळली. जखमींना बसमधून बाहेर काढण्यात आले असून, त्‍यांना उपचारासाठी रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आज (बुधवारी) पहाटे तीन वाजता घडला. ही लक्झरी बस नवसारी येथून शिर्डीला जात होती. चालकाने टोल वाचवण्यासाठी बसचा मार्ग बदलला होता. चालकाचा हा निर्णय प्रवाशांच्या जीवावर उठला.

अधिक माहिती अशी, नवसारी येथून ही बस शिर्डीला जात होती. उंबरपाडा येथील चेकपोस्ट वरील टोल वाचवण्यासाठी चालकाने बसचा मार्ग बदलला होता. गायदर घाटत आल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटल्‍याने बस रस्‍ता सोडून घाटात कोसळली. बुधवारी पहाटे तीन वाजता हा अपघात झाला. यात तीन प्रवाशांचा जागीच मृत्‍यू झाला तर, २२ प्रवासी जखमी झाले. जखमींना बसमधून बाहेर काढले आहे.