News Flash

भाजपत इच्छुकांची धांदल

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या, शनिवारी अंतिम दिवस असल्याने भारतीय जनता पक्षाच्या इच्छुकांमध्ये अर्ज नेण्यासाठी आज धांदल उडाली. सुवेंद्र गांधी, अभय आगरकर, गितांजली

| September 27, 2014 02:50 am

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या, शनिवारी अंतिम दिवस असल्याने भारतीय जनता पक्षाच्या इच्छुकांमध्ये अर्ज नेण्यासाठी आज धांदल उडाली. सुवेंद्र गांधी, अभय आगरकर, गितांजली काळे यांच्यासह पक्षातील सात इच्छुकांनी अर्ज नेले. त्यातील प्रत्यक्षात कोण दाखल करतो याकडे लक्ष लागले आहे. भाजपने शहरातील दहा इच्छुकांची नावे पक्षश्रेष्ठींना कळवली आहेत.
उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनीही उमेदवारी अर्ज नेला. युती तुटल्यानंतर भाजपचा नगर शहरातील उमेदवार आज सायंकाळपर्यंत जाहीर झालेला नव्हता. त्यामुळे अनेकांनी अर्ज नेले. पक्षातील काहींनी अपक्ष म्हणुनही अर्ज नेले. वरील तिघांसह नगरसेविका संगीता खरमाळे, शिवाजी शेलार, मिलिंद गंधे यांनी अर्ज नेले. गंधे, श्रीकांत साठे, यांनी अपक्ष म्हणून अर्ज नेला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनीही तसेच माजी नगरसेवक जयंत येलूलकर, नगरसेवक स्वप्नील शिंदे, माजी उपमहापौर नजीर शेख, मिलिंद मोभारकर यांनीही अपक्ष म्हणून अर्ज नेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 2:50 am

Web Title: bustle of bjp interested candidate in nagar
टॅग : Bjp,Election
Next Stories
1 आघाडी तोडण्याचे पाप काँग्रेसचेच- आर. आर.
2 महायुतीच्या फुटीने कोल्हापुरात उमेदवार शोधासाठी धावपळ
3 मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उंडाळकर अर्ज भरणार
Just Now!
X