News Flash

डहाणूजवळच्या वाढवणमध्ये प्रमुख बंदर उभारण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील डहाणूजवळ असलेल्या वाढवण येथे बंदर उभारण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च ६५,५४४.५४ कोटी इतका येण्याची शक्यता आहे असंही प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं. वाढवणमध्ये होणारे बंदर हे भारतातले सर्वात मोठे बंदर ठरणार आहे. या बंदराला तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. वाढवण बंदरातून कंटेनरची ९० टक्के वाहतूक होणार आहे. वाढवण बंदरातून संपूर्ण देशात माल वितरीत होणार आहे असंही प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं.

कंटेनर जहाजांचा आकार सातत्याने वाढत असल्याने भारताच्या पश्चिमेकडील किनारपट्टी परिसरात खोल ड्राफ्ट कंटेनर पोर्ट विकसित करणं आवश्यक आहे. मूल्यवर्धित उत्पादन क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर कार्गोच्या वाढत्या कंटेनरायझेशनमुळे उत्पादन प्रक्रिया सुलभ करणं आवश्यक आहे. मूल्यवर्धित आणि आयात-निर्यात हाताळण्यासाठी आपल्या बंदर सुविधा तयार करणं महत्त्वाचं होतं. त्यातूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2020 4:46 pm

Web Title: cabinet approves construction new major port vadavan in dahanu scj 81
Next Stories
1 CoronaVirus: वुहानवरुन आले आहे सांगताच बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाने केलं असं काही…
2 अनुसूचित जाती, जमातींवरही ‘सीएए’चा परिणाम होईल; भाजपा नेत्याचा पक्षाला घरचा आहेर
3 निर्भया प्रकरण : चारही दोषींना होणार एकत्रच फाशी!
Just Now!
X