इंदिरा आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात गेल्या आíथक वर्षांत ३ हजार ८६९ घरकुले मंजूर करण्यात आली. परंतु प्रशासनाच्या निष्क्रीय नियोजनामुळे २०१४-१५ या आíथक वर्षांतील ३१४ घरकुले रद्द करण्याची नामुष्की जि. प. प्रशासनावर आली, तर २ हजार ९८१ घरकुलांचे काम अजून अपूर्ण असल्याने घरकुलांचे त्रांगडे कसे सुटणार, असा प्रश्न लाभार्थ्यांमधून विचारला जात आहे.
औंढा नागनाथ ५१७, वसमत ४६०, िहगोली ८६०, कळमनुरी १ हजार १२५, तर सेनगाव तालुक्यातील ९०७ घरकुलांचा यात समावेश आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेसोबतच पाचही पंचायत समित्यांकडे दारिद्रय़रेषेखालील लाभार्थ्यांना यापूर्वी घरकुल मंजूर केले किंवा नाही, याची नोंदच आढळून येत नाही. त्यामुळे सर्व पंचायत समित्यांमधून काही लाभार्थ्यांना दोन वेळा घरकुल मंजूर झाले. काही लाभार्थ्यांनी दारिद्रय़रेषेखालील यादीतून नावे वगळण्याचे अर्ज केल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली. आता झोपेतून जागे झालेल्या प्रशासनाने यापूर्वी घरकुलाचा लाभ दिल्याच्या कारणावरून, तसेच दारिद्रय़रेषेखालील योजनेतून नाव कमी करण्याचा अर्ज आल्याच्या कारणावरून सुमारे ३१४ घरकुले रद्द केली आहेत.
रद्द केलेल्या घरकुलांमध्ये सर्वाधिक कळमनुरीत १४२ लाभार्थ्यांचा समावेश आहे. यानंतर वसमत ४८, सेनगाव ३९, िहगोली ८१, तर औंढा नागनाथमध्ये ४ घरकुलांचा समावेश आहे. उशिरा जाग आलेल्या प्रशासनाने ३१४ घरकुले रद्द केली. परंतु आता ३ हजार ८६९पकी केवळ ६५३ घरकुलांचे काम पूर्ण झाली. उर्वरित २ हजार ९८१ घरकुले अपूर्ण असून ८२ घरकुलांचे काम अजून सुरूच न झाल्याने घरकुलांचे त्रांगडे कसे सुटणार? या वर्षांत घरकुलांचे काम पूर्ण होणार किंवा नाही, असा प्रश्न लाभार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.