23 October 2019

News Flash

पैसे वाटप प्रकरणात आ. घनदाट व उद्योजक गुट्टे यांना अटक

मतदारांना कार्यकर्त्यांमार्फत पसे वाटपाच्या दाखल झालेल्या गुन्ह्यात गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आ. सीताराम घनदाट व ‘रासप’चे उमेदवार उद्योजक रत्नाकर गुट्टे यांना रविवारी पोलिसांनी अटक

| October 6, 2014 01:10 am

मतदारांना कार्यकर्त्यांमार्फत पसे वाटपाच्या दाखल झालेल्या गुन्ह्यात गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आ. सीताराम घनदाट व ‘रासप’चे उमेदवार उद्योजक रत्नाकर गुट्टे यांना रविवारी पोलिसांनी अटक केली. घनदाट यांना तांदुळवाडी येथील प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे, तर गुट्टे यांना खळी येथील पसे वाटप प्रकरणात सहआरोपी केले आहे. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील ‘अर्थ’पूर्ण प्रचाराबाबत ‘लोकसत्ता’ने रविवारीच वृत्त प्रसिद्धीस देऊन या प्रकरणी जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट केले होते. प्रशासनाने खडबडून जागे होत या मतदारसंघात पसे वाटप प्रकरणावर आता करडी नजर ठेवली आहे.
आज पहाटे घनदाट यांना पालम येथे तर गुट्टे यांना दुपारी साडेचार वाजता पूर्णा येथे पोलिसांनी अटक केली. घनदाट यांच्या घराची तर गुट्टे यांच्या साखर कारखाना व गंगाखेडमधील कार्यालयाची झडती घेण्यात आली.
गंगाखेड तालुक्यातील तांदुळवाडी येथे  गुरुवारी (दि. २) एका अपक्ष उमेदवाराचे पसे वाटप चालू असताना भरारी  पथक गावात पोहचले. भरारी पथकाला पाहून या कार्यकर्त्यांनी २७ हजार रुपये व प्रचार साहित्य जागेवर सोडून गावातून पळ काढला. या प्रकरणी पोलीस कर्मचारी व्यंकट मुंडे यांच्या तक्रारीवरून  जयसिंग िशदे, भगवान पाटील, प्रभाकर जाधव, सुभाष गोंदलवाड या आरोपींना अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास करीत असताना पोलीस उपनिरीक्षक भाकरे यांना मतदारांना पसे वाटप करण्याच्या कृत्यात अपक्ष उमेदवार आ. सीताराम घनदाट यांचाही अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे गुन्ह्यात भादंविचे १०९ कलमान्वये शनिवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास आ. घनदाट यांना अटक केली. यावेळी घनदाट यांच्या घराचीही झडती घेण्यात आली.
खळी येथेही मतदारांना पसे वाटप होत असल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला होता. या ठिकाणाहून पोलिसांनी १ लाख ८७ हजार ४५० रुपये जप्त करून गुट्टे यांचा कार्यकर्ता आत्माराम उत्तमराव जाधव यास अटक केली. आचारसंहिता पथक आल्याचे पाहून इतर दोघांनी एमएच४४जी ७५५५ या गाडीतून पोबारा गेला. ही गाडी कुणाच्या नावे आहे याबाबत अंबाजोगाईच्या उपप्रादेशिक कार्यालयाला पत्र दिले आहे, अशी माहिती गंगाखेडचे पोलीस निरीक्षक जीजा राठोड यांनी दिली, तर गुट्टे यांच्यासाठीच कार्यकत्रे पसे वाटप करीत होते हे तपासात निष्पन्न झाल्याने गुट्टे यांनाही सहआरोपी करून रविवारी दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास पूर्णा येथे अटक करण्यात आली. आज त्यांच्या गंगाखेड शुगर्स कारखाना व  कार्यालयाची झडती घेण्यात आली.

First Published on October 6, 2014 1:10 am

Web Title: candidate arrest in corruption