केळवा समुद्र किनाऱ्यावर विना परवानगी प्री वेडिंग शूट करणाऱ्या भावी वधू-वरासह पंधरा जणांवर केळवे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये चार महिलांचा समावेश आहे.
पालघर जिल्ह्यातील समुद्रकिनारे,पर्यटनस्थळे,धबधबे येथे पर्यटकांना सध्या बंदी आहे. ही बंदी असतानाही कोणत्याही प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय केळवे समुद्रकिनारी बुधवारी प्री वेडिंग शूट सुरू असताना, केळवे पोलिसांनी ही कारवाई केली. १७ जणांवर ही कारवाई केली आहे.
केळवे सागरी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. संध्याकाळी उशिराने शूट करणाऱ्या समूहाला ताब्यात घेऊन, नोटीस देऊन सोडण्यात आले असल्याचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 21, 2020 7:28 pm