05 April 2020

News Flash

घ्या! लग्नाची हौस फिटली; वधू-वर, आईवडिलांसह भटजीही पोलिसांच्या ताब्यात

आठ जणांवर गुन्हा दाखल

(संग्रहित छायाचित्र)

करोनामुळे सध्या सगळी भीतीचं वातावरण आहे. आजाराचा संसर्ग वाढू नये म्हणून सरकारही प्रतिबंधात्मक पावलं उचलतं आहे. गर्दी कमी करण्यासाठी आवश्यक उपाय सरकारनं हाती घेतले आहेत. याचाच भाग म्हणून गर्दी होणारे सगळे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले आहेत. मात्र, हे आदेश धुकावून लावत लग्नाची हौस करणं चांगलंच अंगलट आलं आहे. त्यामुळे वधू-वर, त्यांचे आईवडिल आणि भटजीही सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.

माजलगाव शहरापासून १किमी अंतर असलेल्या ब्रम्हगाव येथे दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास लग्नासाठी पाहुणे जमले असल्याची माहिती पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत डिसले यांना मिळाली . यावरून त्यांनी शहर पोलिसांना लग्नस्थळी जाण्यास सांगितले . सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड पोलीस ताफा घेऊन लग्नस्थळी गेले असता, यावेळी पोलिसांना लग्नस्थळी १००- १२५ लोक जमल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी करोना संसर्गाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाची आठवण करून दिली व जमलेल्यांना पाहुण्यांना परत जाण्यास सांगितले. मात्र, पोलिसांच्या आवाहनाला नकार देत लग्न लावण्याचा प्रयत्न उपस्थितांनी केला. त्यामुळे पोलिसांनी लग्न लावण्यास आलेले भटजी, फोटोग्राफरसह आठ जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. यानंतर ५-६ नातेवाईकांनी सदरचे लग्न उरकुन घेतल्याची माहिती आहे. या घटनेनं येत्या काही दिवसात लग्न असणाऱ्या कुटुंबीयांमध्ये खळबळ माजली आहे.

यांच्यावर दाखल झाला गुन्हा –

विठ्ठल पांडुरंग कांबळे (रा . ब्रम्हगाव ता . माजलगाव ( नवरीचे वडील ), मनकर्णा सुभाष पाटोळे (रा लवुळ ता. माजलगाव ( नवरदेवाची आई ), ज्ञानेश्वर उद्धव पाटोळे (रा . लवुळ (नवरदेवाचे चुलते ), चंदू महादेव आटवे (रा . लवुळ) यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2020 2:50 pm

Web Title: case registered against eight people after collector order violation bmh 90
Next Stories
1 करोनाच्या वातावरणात आरोग्य विमा विकण्याची सूचना
2 औरंगाबाद हादरलं; मुलीला पळवल्याच्या संशयातून तरुणाच्या भावाची गळा चिरून हत्या
3 करोनामुळे कैद्यांच्या आहारात बदल
Just Now!
X