News Flash

रेशनवरील धान्याचा काळाबाजार; दुकानदारावर गुन्हा दाखल

परवाना रद्द करण्‍याची कार्यवाही सुरू

संग्रहीत

टाळेबंदीच्या काळात अन्न धान्याची टंचाई भासत असतानाच रेशनवरील धान्याचा काळाबाजार होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अलिबाग तालुक्यातील दिघोडी येथील रास्तभाव दुकान परवाना धारक महेंद्र ठाकूर व त्यांचा नोकर महेश ठाकूर यांच्या विरोधात धान्‍याचा काळाबाजार केल्‍याप्रकरणी मांडवा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .

पोलिसांनी या दुकानात बनावट ग्राहक पाठवून हा काळाबाजार उघडकीस आणला आहे . शासनाने 3 रुपये किलो दराने विक्रीसाठी दिलेला तांदूळ चक्क प्रतिकिलो 20 रुपये अधिक घेऊन विकताना या दुकानातील नोकराला रंगेहात पकडण्यात आले. बनावट ग्राहक असलेल्‍या या व्‍यक्‍तीकडे पोलिसांनी पैसे दिले त्‍या पैशात कोणतेही रेशन कार्ड नसतानाही त्‍या व्‍यक्‍तीने या दुकानातून जादा पैसे मोजून 50 किलो तांदूळ विकत घेतला. त्‍याचवेळी पोलीस आाणि पुरवठा विभागाच्‍या अधिकाऱ्यांनी दुकानात छापा मारला.

सध्‍या लॉकडाउन असल्‍याने नागरिकांना पुरेसे धान्‍य मिळत नसल्‍याच्‍या अनेक तक्रारी येत होत्‍या. या तक्रांरीवरून आता पोलीस आणि पुरवठा विभागाने छापासत्र सुरू केले आहे. दिघोडी येथील या कारवाईनंतर रेशनिंगवरील धान्‍याचा काळाबाजार करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहे.  आता या दुकानाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी एम. एस. बोडके यांनी दिली आहे.

दुकानाचा परवाना रदद करण्‍याची कारवाई –

स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पोलीस व पुरवठा विभागाने  संयुक्‍तरित्‍या ही कारवाई केली आहे. संबंधित रास्‍तभाव धान्‍य दुकानदार व त्‍यांच्‍या नोकराविरोधत गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे . या दुकानाचा परवाना रदद करण्‍याची कारवाई सुरू करण्‍यात आली आहे

-एम.एस.बोडके, जिल्‍हा पुरवठा अधिकारी, रायगड

आणखी वाचा- काळाबाजार..! बीडमध्ये पेट्रोल १५० रुपये लिटर, तेही रॉकेल मिश्रीत

हेल्‍पलाईनचा वापर करा –

लॉकडाउन नंतर रेशनवरील धान्‍य मिळत नसल्‍याच्‍या तक्रारी वाढल्‍या आहेत . करोना नियंत्रणासाठी लागू केलेल्‍या लॉकडाउनच्‍या कालावधीत शिधा वस्‍तू उपलब्‍धतेचे संनियंत्रण करताना रेशनिंग हेल्‍पलाईनचा जनतेने वापर करण्‍याची आवश्‍यकता आहे. रेशनिंगच्‍या तक्रारी किंवा माहितीसाठी हेल्‍पाईन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्‍यात आले आहे. यासंदर्भात ई मेलची सोयदेखील करण्‍यात आली आहे.  ही सेवा निशुल्‍क आहे. हेल्‍पलाईन क्रमांक – 1800 , 224950 , 1967  असून ईमेल –  helpline.mhpds@gov.in  आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2020 5:01 pm

Web Title: case registered against worker along with shopkeeper for sell 3 rupees kg rice to 20 rs per kg msr 87
Next Stories
1 काळाबाजार..! बीडमध्ये पेट्रोल १५० रुपये लिटर, तेही रॉकेल मिश्रीत
2 Coronavirus : करोना झाल्याच्या भीतीने नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या
3 माणुसकी: बीड समाज कल्याण उपायुक्तांनी केलं ६४ मनोरुग्णांचं केसकर्तन
Just Now!
X