News Flash

सेंट जॉन शैक्षणिक संस्थेच्या कॅम्पसमध्ये चोरी

या चोरीप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत

पालघर येथील सेंट जॉन शैक्षणिक संस्थेच्या परिसरात असलेल्या शैक्षणिक कार्यालयावर दरोडा टाकून सुमारे पाच लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. पालघरपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या या शैक्षणिक आवारामध्ये पहिली ते दहावीपर्यंत शाळा, अभियांत्रिकी महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालयातील कार्यालयातील काही मोजकी कपाटे फोडण्यात आली. चार चोरांनी मध्यरात्रीनंतर या शैक्षणिक संस्थेच्या आवारात प्रवेश केला. ज्या कपाटांमध्ये परीक्षेच्या प्रवेश शुल्काच्या रूपाने गोळा केलेली रोख रक्कम ठेवली होती ती कपाटे नेमकी फोडून रोख रक्कम लंपास केली आहे.

हे चोर सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. शैक्षणिक संस्थेच्य आवारत असलेल्या कार्यालयांमधील नेमकी रोख रक्कम असलेली कपाटंच कशी फोडण्यात आली? हा प्रश्न पोलिसांनीही पडला आहे. या चोरीमध्ये संस्थेतील कोणी माहितगार नाही ना? याचाही शोध पोलीस घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 10:04 am

Web Title: cash theft from palghars st john institute of pharmacy scj 81
Next Stories
1 मनसेच्या झेंड्यावरील राजमुद्रा हा शिवप्रेमींचा अवमान
2 CAA, NRC विरोधात वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र बंद
3 महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रचलं जातंय कारस्थान; राज ठाकरेंचा गौप्यस्फोट
Just Now!
X