‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ असे आपण ऐकतो. त्याचे अनेक प्रकार आपणाला पाहायला मिळतात. मात्र, प्रेयसीचा हट्ट पुरविण्यासाठी चक्क मांजर चोरण्याची घटना काही सर्वसामान्य म्हणता येणार नाही. अर्थात, ही मांजर काही साधीसुधी नसून पर्शियन मांजर असल्याने हे प्रकरण पोलिसांत पोहोचले. अपवादाने घडणाऱ्या नागपुरातील घटनेत प्रियकर व प्रेयसीला चक्क तुरूंगाची हवा खावी लागली.

हर्षल गजानन मानापुरे (३१) रा. मानकापूर आणि विलेशा चैत्राम बन्सोड रा. ताजनगर झोपडपट्टी अशी या प्रकरणातील प्रेमीयुगुलाची नावे आहेत. डॉ. अंजुमन सय्यद (४२) रा. ताजनगर असे फिर्यादीचे नाव आहे. कॅटरिंगच्या कामातून हर्षल व विलेशाचा परिचय झाला. कालांतराने हे प्रकरण प्रेमापर्यंत पोहोचले. अनेकदा ताजनगर परिसरात दोघे एकाच घरात ‘लिव्ह इन’मध्ये राहायचे. विलेशा ही परिसरातून ये-जा करीत असताना डॉ. अंजुमन यांच्याकडे वेगवेगळया प्रजातीच्या मांजरी दिसायच्या. त्यापैकी एक तिला खूप आवडायची.

RRB Recruitment 2024
RRB Recruitment 2024: रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
mini paneer sabudana vada recipe
Recipe : तेलात न तळता बनवा साबुदाण्याचे कुरकुरीत ‘प्रोटीनयुक्त’ मिनी वडे! बनवताना घाला फक्त ‘हा’ पदार्थ
Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या

डॉ. अंजुमन यांच्या घरासमारून जाताना ती थांबून मांजरीला बघत बसायची. प्रियकरासोबतच तिचे त्या मांजरीवरही प्रेम जडले. तिने प्रियकर हर्षलकडे तसे मांजर हवे, अशी मागणी केली. त्याने त्या मांजरीसंदर्भात चौकशी केली असता ती पर्शियन मांजर असून तिची बाजारातील किंमत ३० हजार असल्याचे त्याला समजले.

मांजर विकत घेण्यासाठी त्याच्याकडे इतके पैसे नव्हते. त्याने काही दिवस तो विषय टाळला. पण, विलेशाच्या मनातून मांजर जात नसल्याने तीने आपला हट्ट कायम ठेवला. अखेर शुक्रवारी संध्याकाळी त्याने डॉ. अंजुमन यांच्या घरातून मांजर पळवून विलेशाच्या हाती सोपविले. डॉ. अंजुमन घरी परतल्या असता त्यांना ती मांजर दिसली नाही. त्यांनी ताबडतोब पोलिसांत तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर शेख यांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक मिश्रा, संतोष राठोड, प्रमोद दिघोरे, राजेश वरटी आणि रोशनी यांनी तपास केला. त्यावेळी डॉ. अंजुमन यांनी एका मुलीवर शंका उपस्थित केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासून तरुणीला शोधून काढले. विलेशाने मांजर चोरल्याचे नाकारले. तिचा प्रियकर हर्षल यालाही रात्री बोलवण्यात आले. त्यानेही काहीच सांगितले नाही.