News Flash

येस बँक प्रकरण: सीबीआयचं पथक वधवान बंधुंना घेऊन चौकशीसाठी महाबळेश्वरात

येस बँकेत घोटाळा केल्याचा आरोप असलेले उद्योगपती धीरज व कपिल वाधवान यांना मागील आठवड्यात सीबीआयने अटक केली आहे.

संग्रहित छायाचित्र

सीबीआयचे पथक वधवान बंधूंना घेऊन आज चौकशीसाठी महाबळेश्वर येथे आले आहेत. सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून वाधवान हाऊसमध्ये या बंधुंची चौकशी सुरु आहे.

येस बँकेत घोटाळा केल्याचा आरोप असलेले उद्योगपती धीरज व कपिल वाधवान यांना मागील आठवड्यात सीबीआयने अटक केली आहे. त्यांना मुंबई येथील सीबीआय न्यायालयात हजर केले असून सध्या ते सीबीआयच्या कोठडीत आहेत. त्यांच्यावरील आरोपांच्या अनुषंगाने त्यांची चौकशी सुरू आहे. चौकशीसाठी दोन्ही बंधूंना सीबीआय पथक आज महाबळेश्वर येथे घेऊन आले आहे.

या चौकशीदरम्यान सायंकाळी त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. सकाळपासून त्यांची चौकशी सुरु आहे. त्यांच्या निवासस्थानाबाहेर महाबळेश्वर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मात्र, या चौकशीबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 10:11 pm

Web Title: cbi team takes wadhwan brothers to mahabaleshwar for interrogation aau 85
Next Stories
1 धक्कादायक! मालेगावात पीपीई किट, एन-९५ मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोव्हज गोदामात पडून
2 सोलापुरात करोनामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा पहिला बळी
3 महाराष्ट्रातील परवानाधारक वाईन शॉप्समध्ये ४३ कोटी ७५ लाखाची मद्यविक्री
Just Now!
X