लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी घोषित करण्यात आला. यामध्ये अकोल्यातील विद्यााथ्र्यांनी बाजी मारली. ‘प्रभात’ किड्स, नोएल स्कूल आदी शाळांचा निकाल १०० टक्के लागला. ‘प्रभात’मधून दीप उनडकाट याने ९८.४ टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला. नोएल स्कूलमधून सायली खेडकर ही विद्याार्थिनी ९८.४ टक्के गुणांसह शाळेतून प्रथम क्रमांकावर आली.

प्रभात किड्सचे १९८ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेसाठी बसले होते. ‘प्रभात’चा दीप उनडकाट याने ९८.४ टक्के गुणासह सामाजिक शास्त्रामध्ये १०० पैकी १०० गुण मिळवले. ‘प्रभात’च्या ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण ५६ गुणवंत विद्यााथ्र्यांनी प्राप्त केले आहेत. आस्था लोया ९८ व ख्याती लोहिया हिने प्रत्येकी ९८ टक्के गुण प्राप्त केले आहे. तसेच ध्रुव सारडा ९७.६, गायत्री मिश्रा ९७.४, हर्ष कुळकर्णी ९७.४, आदित्य राठी ९७.४, रसिका रहाने ९६.८, अंकूश पाटील ९६.६, सृष्टी म्हैसने ९६.६, ओम मानकर ९६.२, वेदांज बंकेवार ९६, अमिशा साहू ९६, साहिल वाडकर ९५.४, गायत्री धनोकार ९५.२, अर्थव दाबेराव ९५.२, महिमा जैन ९५ टक्के गुण मिळवले. एकूण १९८ विद्याार्थ्यांपैकी १३० विद्याार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त केले आहे.

यशस्वी विद्याार्थ्यांचे ‘प्रभात’चे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका वंदना नारे, सचिव नीरज आवंडेकर, तज्ज्ञ संचालक कांचन पटोकार, प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, व्यवस्थापक अभिजीत जोशी आदींनी कौतुक केले. नोएल स्कूलमधील ८४ पैकी २६ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले. शाळेने १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली.