राज्यात करोनाचे सावट असताना उद्या मराठी नववर्षाची सुरुवात अर्थात गुढी पाडव्याचा सण आहे. यापार्श्वभूमीवर गर्दी न करता घरगुती स्वरुपात गुढी पाडवा साजरा करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला केले आहे. तसेच पाडव्याच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, “गुढी पाडवा म्हणजे दुष्टप्रवृत्तीचा नाश करून मिळवलेल्या विजयाचा दिवस. यश, विजयाचे प्रतीक असलेली गुढी त्यामुळेच उंच उभारली जाते. हे संकल्पाच्या सिद्धीचेही प्रतीक आहे. यातून प्रेरणा घेऊन आपणही कोरोनारुपी संकटावर मात करू, गर्दी न करता घरगुती स्वरूपात उत्सव साजरा करू.”

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना मुख्यमंत्री म्हणाले, “उद्या हिंदू नववर्षाचा प्रारंभ होत आहे. या दिवशी घरोघरी आरोग्याची, सुरक्षिततेची गुढी उभारा. संयम, स्वयंशिस्त, सहकार्यातून संकटावर मात करण्याच्या जिद्दीतून त्याच्या हद्दपारीचा संकल्प करा.