01 March 2021

News Flash

ग्रामस्थांकडून एसटीचा वाढदिवस साजरा

गावकरम्य़ांचे एसटीच्या बससेवेशी जोडले गेलेले रुणानुबंध कायम आहेत.

घटती प्रवाश्यांची संख्या आणि महामंडळाला होणारा तोटा हि एक चिंतेची बाब असली तरी, ग्रामिण भागात आजही एसटी बसशी जोडलेला प्रवाश्यांचा जिव्हाळा कायम आहे. अलिबाग तालुक्यातील सांबरी गावातील लोकांनी हाच रुणानुबंध जपत गावात आलेल्या एसटी बसचा वाढ दिवस साजरा केला.

सांबरी..अलिबाग तालुक्यातील शेवटच्या टोकावरच गाव, जिथे रस्ते वीज पाणी यासारख्या मुलभुत सुविधांची वानवा होती. वाहतुकींची संसाधनंही नव्हती. अशा काळात गावातील कामानिमीत्याने मुंबईत स्थायिक झालेल्या लोकांच्या सोयीसाठी एस टी महामंडळाने सांबरी ते परळ ही बससेवा सुरु केली.

आज या घटनेला तब्बल २५ वर्ष पुर्ण झाली. एसटी महामंडळाने सांबरी ते परळ ही बससेवा अव्याहतपणे आहे. आज गावात चांगले रस्ते आहेत, वाहतुकीची नवीन साधनेही आहेत. पण गावकरम्य़ांचे एसटीच्या बससेवेशी जोडले गेलेले रुणानुबंध कायम आहेत. याचीच जाण ठेऊन, गावकऱ्यांनी एकत्र येत आज एसटीचा २५ वा वाढदिवस साजरा केला.

सांबरीतील ग्रामस्थ दुपारपासूनच एस. टी. ची वाट पहात बसले होते . गावात गाडी येताच ग्रामस्थां नी हारफुले तोरण बांधून तिची सजावट केली. सुवासिनींनी ओवाळून बसची विधीवत पुजा केली. एसटीचे चालक आणि वाहक यांचाही सत्कार केला. यानंतर स्थानिक जिल्हा  परीषद सदस्याय चित्रा पाटील यांच्यात हस्ते  केक कापण्याोत आला. आमदार सुभाष पाटील यांनी हिरवा झेडा दाखवून लाडक्या एसटीला मुंबईकडे रवाना केले. या अनोख्या वाढदिवसासाठी गावातील अबालवृध्द जमले होते.

अनोख्या सोहळ्यामुळे एसटीचे चालक वाहक भारावून गेले. आज एस. टी. बददल लोक फार चांगलं बोलत नाहीत अशावेळी सांबरीच्या ग्रामस्थांजनी आम्हामला सन्माानीत केलं त्याअमुळे आम्हााला आनंद तर झालाच पण काम करण्यानची नवी उमेद मिळाली अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

आजही ग्रामिण भागातील ७० टक्के प्रवासी एसटीनेच प्रवास करतात. ग्रामिण भागातील जिवनवाहिनी म्हणूनही एसटीकडे बघितले जाते. त्यामुळे ग्रामिण भागात एसटीची बससेवा निरंतर सुरु रहावी अशी अपेक्षा कुर्डूसचे सरपंच संदिप पाटील यावेळी सर्वांनी व्यक्त केली.

एसटी महामंडळाला असंख्य समस्यांना तोंड द्यवे लागते आहे. बस स्थानके आणि आगारांची असुविधा कायम आहेत. एसटीला होणारा तोटा ही देखील नित्याचीच बाब आहे. अशा प्रतिकुल परिस्थितीतही एसटीने ग्रामिण भागात आपली विश्वसार्हता जपली आहे. एक सुरक्षित प्रवासाचे संसाधन म्हणून बससेवेकडे बघीतले जात आहे. याचा प्रत्यय सांबरी येथील गावकऱ्यांच्या या अनोख्या सोहळ्यावरून येतोय.

‘कमी पगारात चालक, वाहक काम करून प्रवाशांना निश्चित स्थळी सुरक्षीत पोहचवत असतात. एसटीतील कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळाले पाहिजे, ग्रामिण भागातील बसस्थानकांचा दर्जा सुधारायला हव्यात.’

सुभाष पाटील, आमदार 

‘ज्या काळात वाहतुकीची संसाधने उपलब्ध नव्हती. दळणवळणासाठी गावकऱ्यांना दहा दहा किलोमिटरची पायपीट करावी लागत होती. त्याकाळी एसटीने गावकऱ्यासाठी बससेवा सुरु केली. या सेवेला आज २५ वर्ष पुर्ण झाली आहेत. गावकऱ्यांसाठी हा आनंदाचा क्षण आहे.’

अशोक डावर, स्थानिक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2018 3:05 am

Web Title: celebrate st bus birthday in alibaug
Next Stories
1 हातमाग व्यवसायाची अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड
2 रायगडमधील पर्यटनस्थळांचा कोंडमारा!
3 शहरांना कृषी पर्यटनाचे आकर्षण
Just Now!
X