पालघर जिल्ह्य़ात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त अनेक तालुक्यांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी समाजातील संस्कृती, परंपरा आदी या कार्यक्रमांतून सादर करण्यात आल्या.

पालघर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकपासून आर्यन शाळेच्या पटांगणापर्यंत भूमीसेना, आदिवासी एकता परिषद व इतर आदिवासी सामाजिक संस्थांनी रॅलीचे आयोजन केले होते. यामध्ये पारंपरिक वेशभूषा परिधान करून अनेक आदिवासी बांधव, लहान मुले- मुली सहभागी झाले होते. तारपासह इतर आदिवासी नृत्यांचे आयोजन या कार्यक्रमात करण्यात आले. पालघर तहसील कार्यालयाजवळ आर्यन शाळेच्या मैदानाजवळ या रॅली समारोप झाला. याचप्रमाणे बोईसर, डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, मनोर आदी ठिकाणी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
lokrang
गीतांचा भीमसागर…: चळवळीची गाणी…
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

संस्था, संघटनांचा संयुक्त कार्यक्रम

आदिवासी एकता परिषद, आदिवासी समाजोन्नाती संघ, आदिम जमाती विकास संस्था, आदिवासी अस्मिता संस्था, शूर झलकारी महासंघ, आदिवासी शिक्षक संघटना यांनी ठिकठिकणी संयुक्त कार्यक्रम पार पाडले. डहाणू वाणगाव, चारोटी कासा येथे आदिवासी दिन साजरा करण्यासाठी बहुसंख्य बांधव एकत्र आले होते. भर पावसातही कार्यक्रम मोठय़ा उत्साहात साजरा झाला.

 ‘डीजे’ सूर, गुणवंताचा सत्कार

चारोटी गाव ते कासादरम्यान डीजेच्या तालासुरात आदिवासी बांधवांनी वाजतगाजत मिरवणूक काढून जल्लोष केला. सयवन ते कासापर्यंत दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ठिकठिकाणच्या मिरवणुका कासा येथे जमून सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडण्यात आले. यावेळी आदिवासी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रांत उत्तुंग काम करत असलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

आश्रमशाळांतही उत्साह

आदिवासी विकास विभाग संचालित आश्रमशाळेत या दिनाचा उत्साह दिसून आला. गंजाड, रानशेत, धुंदलवाडी, आगवन, रणकोळ, तवा, दाभोण, सायवन, बापुगाव, महालक्ष्मी आदी आश्रमशाळांत सांस्कृतिक कार्यक्रमातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले.

वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेषात तारपा नृत्य सादर करून सांस्कृतिक मूल्य जपली.

डहाणूत जल्लोष

डहाणू :  डहाणू तालुक्यात डहाणू, आशागड, गंजाड, रानशेत, सारणी, म्हसाड, सायवम, कासा, चारोटी, तवा, महालक्ष्मी आदी ठिकाणी आदिवासी दिनाचा जल्लोष पाहावयास मिळाला. डहाणू शहरात तारपा चौकामध्ये मशाल पेटवून डहाणू ते गंजाड आणि पुन्हा डहाणूपर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये बहुसंख्य आदिवासी बांधव सहभागी झाले होते. बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तारपा चौक येथे  आदिवासी कार्यकर्त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून आदिवासी संस्कृतीचे सादरीकरण केले. आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रेक्षकांची मने जिंकली.

तारपा, सांबळ, तूर, मादोळ..

कासा : जव्हार तालुक्यातील तलासरी जि. प. शाळेत वेशभूषेमार्फत आदिवासींच्या पारंपरिकतेचे सादरीकरण करण्यात आले. आदिवासी बांधवांचे पारंपरिक नृत्य आविष्काराचे दर्शन यावेळी घडले. यामध्ये तारपा, ढोल, सांबळ, तूर, गरभा, मादोळ आदी विविध नृत्य प्रकारांचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. पारंपरिक वेशभूषेत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात हजारो आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला. आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन यावेळी आदिवासी समाजाचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.