23 September 2020

News Flash

‘डॉक्टर’ आम्ही तुमच्याबरोबर..!

शहरातील सिडको येथील बजरंग चौकाचा आज काही वेगळाच रंग होता. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्यासह साहित्य, पत्रकारिता व विविध क्षेत्रांतील नामवंतांनी भारतीय कम्युनिस्ट

| October 13, 2014 01:30 am

शहरातील सिडको येथील बजरंग चौकाचा आज काही वेगळाच रंग होता. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्यासह साहित्य, पत्रकारिता व विविध क्षेत्रांतील नामवंतांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार डॉ. भालचंद्र कानगो यांच्या समर्थनार्थ प्रचारफेरी काढली. संदेश होता ‘डॉक्टर, आम्ही तुमच्याबरोबर आहोत’.
 औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून भाकपने डॉ. भालचंद्र कानगो यांना उमेदवारी दिल्यानंतर गृहभेटी आणि वेगवेगळ्या भागात प्रचारफेऱ्यांचे आयोजन सुरू होते. त्यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभाही घेण्यात आली. विकासाचे प्रश्न धसास लावू शकतो, अशा क्षमतेचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविला पाहिजे, यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि हितचिंतकांनी नवीन संदेश दिला. लाल रंगाचे झेंडे आणि लाल फुगे घेऊन उघडय़ा जीपमधून डॉ. कानगो यांची मिरवणूक काढण्यात आली. तत्पूर्वी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यासाठी कवी दासू वैद्य, डॉ. आनंद नाडकर्णी, श्रीकांत उमरीकर आदींची उपस्थिती होती. डाव्या विचारांच्या वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. या वेळी युवकांनी पथनाटय़ही सादर केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 1:30 am

Web Title: celebrity support to bhalchandra kango
टॅग Aurangabad,Election
Next Stories
1 एनसीपीचा शब्दविस्तार ‘नॅचरल करप्ट पार्टी- मोदी
2 घोटाळेबाजांना तुरुंगात डांबू – अमित शाह
3 महा‘कंत्राट’ वितरण हा दुसरा सिंचन घोटाळाच
Just Now!
X