01 December 2020

News Flash

डहाणूत सिमेंट कारखाना

पर्यावरणीय मंजुरीसाठी अहवाल सादर

पर्यावरणीय मंजुरीसाठी अहवाल सादर; ५०० जणांना रोजगाराची हमी

निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : जिल्ह्यात एकापाठोपाठ एक मोठे प्रकल्प उभे राहत असताना आता डहाणू तालुक्यात सिमेंट निर्मितीचा मोठा कारखाना उभा राहणार आहे. या कारखान्याच्या विविध परवानगीसाठीचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे प्रस्तवित केला आहे.

हा कारखाना अदानी समूहामार्फत उभारला जाणार आहे.अदानी सिमेंटेशन कंपनीने याबाबतच्या कंपनीअंतर्गत प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या प्रकल्पाचा प्रस्ताव पर्यावरणीय व तत्सम विभागाच्या मंजुरीकरिता सप्टेंबरमध्ये पाठविला आहे. हा कारखाना अदानी वीज निर्मिती प्रकल्पाच्या आवारात आगवन येथील कंपनीच्या जागेत उभारण्यात येणार असल्याचे प्रस्तावात म्हटले आहे.

डहाणू सिमेंट ग्राइंडिंग युनिट या नावाने हा कारखाना ओळखला जाईल. या कारखान्यासाठी सुमारे सहा हेक्टर  म्हणजेच ३० एकर जमीन अपेक्षित असल्याचे पाठविलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. कारखानासाठी ७९० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. तर कारखान्यातून दरवर्षी तीन दशलक्ष टन  सिमेंट उत्पादित केले जाणार आहे. या कारखान्यातून प्रत्यक्षरीत्या ६५, तर अप्रत्यक्षरीत्या ५०० जणांना रोजगार मिळणार असल्याचे अदानी कंपनीने केंद्राकडे पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे.

अदानी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून निघणाऱ्या राखेच्या पार्श्वभूमीवर  हा सिमेंट कारखाना उभा राहत आहे. या केंद्रातून निघणारी विविध प्रकारची टाकाऊ राख ही सिमेंटमध्ये मिसळून त्याद्वारे सिमेंट उत्पादित केले जाणार आहे. त्यातून ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट आणि पोर्टलँड स्लॅग सिमेंटचे उत्पादन घेतले जाणार आहे. वीज निर्मिती प्रकल्प आवारात टाकाऊ राखेपासून सिमेंट तयार होणार असल्याने ते स्वस्त असेल असे सांगितले जात आहे.

परवानगी मिळाल्यास पायाभरणी

या कारखान्यासाठी येणारा कच्चा माल हा समुद्री आणि रस्ते तसेच लोहमार्गाने प्रकल्प आवारात आणला जाणार आहे. या कारखाना निर्मितीबाबतच्या संपूर्ण पर्यावरणीय अहवालासह प्रकल्प अहवाल तसेच पर्यावरणीय संदर्भीय अटींसाठी ( ३ी१े२ ऋ १ीऋी१ील्लूी) केंद्रीय पर्यावरण तज्ज्ञ मूल्यांकन समितीसमोर सादर करण्यात आला आहे. ही परवानगी मिळावी, यासाठी जोरदार हालचाली सुरू असून परवानगी प्राप्त झाल्यास सिमेंट उत्पादन कारखान्याची पायाभरणी सुरू केली जाईल, असे सूत्रांकडून समजते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 2:21 am

Web Title: cement factory in dahanu zws 70
Next Stories
1 वसई-विरारमध्ये ओल्यासोबत सुकेही जाते..
2 अपघात रोखण्यासाठी जनावरांच्या शिंगांना रेडियम
3 पालघरमध्ये आता जिल्हा पक्ष्यांसाठी निवडणूक
Just Now!
X