मुंबई : राज्यात गेल्या वर्षी म्हणजे जून ते ऑक्टोबर २०२० दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे ३७२१ कोटी रुपयांची मागणी के ली असताना केंद्रातील मोदी सरकारने मात्र मंगळवारी के वळ ७०१ कोटी रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर करत शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून अर्थसहाय्य करण्याची विनंती राज्य सरकारने केंद्राकडे एका निवेदनाद्वारे केली होती. अतिवृष्टीनंतर नुकसान भरपाईपोटी ३७२१ कोटींची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली होती. मात्र केंद्र सरकारने कोणताच निर्णय न घेतल्याने दरम्यानच्या काळात राज्य सरकारने ४३७५ कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीपोटी दिली होती. चक्रीवादळानंतर महाराष्ट्राचा दौरा न करता गुजरातचा दौरा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल एक हजार कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर के ली होती. त्याही वेळी महाराष्ट्रालाही चक्रीवादळाचा तडाखा बसलेला असताना केंद्राने दुर्लक्ष के ले होते.

मागील वर्षी अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारने ३७२१ कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यापैकी ७०१ कोटी रुपये मदत देण्याचे केंद्र शासनाने घोषित केले आहे,अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. तसेच आता कोकण तसेच इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून केंद्र सरकारने सढळ हस्ते मदत करावी, अशी मागणीही भुसे यांनी के ली.