केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री जावडेकर यांची माहिती

राहाता :  बनावट पी.एच.डी. रोखण्यासाठी टर्निटिन सॉफ्टवेअर बनविण्यात आले असून त्यातून वाङ्मयचौर्य करून प्रबंध सादर करणाऱ्यांचा छडा लावला जाईल, दुसऱ्या कुणाची नक्कल केल्यास संबंधिताना पीएचडी (विद्यावाचस्पती) पदवी दिली जाणार नाही, असे मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे सांगितले. तसेच निवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याचा कोणताही विचार केंद्र सरकारचा नसून हा विषय राज्य सरकारचा आहे अशी माहिती त्यांनी शिर्डीत दिली. शिर्डीच्या साईबाबा ट्रस्टचा वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव आला तर इंडियन मेडिकल असोसिएशन व आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करू असे आश्वासन त्यांनी दिले.

Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
Pimpri-Chinchwad, Pimpri-Chinchwad buy vehicle
पिंपरी-चिंचवडकरांची वाहन खरेदीला पसंती, ‘इतक्या’ वाहनांची खरेदी

शनिवारी सायंकाळी प्रकाश जावडेकर यांनी साईबाबांच्या मंदिरात धूपआरतीस हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले. या वेळी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे, विश्वस्त बिपीन कोल्हे, भाऊसाहेब वाकचौरे,  भाजपचे शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर, सरचिटणीस रवींद्र गोंदकर, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम आदि मान्यवर उपस्थित होते.

केंद्र सरकारने किमान निवृत्तिवेतन पाचशेवरून हजारावर वाढविले, असंघटित कामगारांचे किमान वेतन वाढविले असल्याचे सांगत जावडेकर म्हणाले की साईबाबांच्या दर्शनाने नेहमीच भारून जाण्याचा अनुभव येतो. साईचे एक विलक्षण दर्शन असून यासाठी देशविदेशातून लाखो भाविक येतात. बायोमेट्रिक दर्शनाने भक्तांची मोठी सोय झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

भाविकांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहिली नाही वेळेनुसार त्यांचे दर्शन होते. तिरुपतीमधील केसदानाप्रमाणे शिर्डीत रक्तदान ही नवी चळवळ सुरू झाली. या वेळी शताब्धी वर्षांत शिर्डी ग्रामस्थ आयोजित १७१ व्या अखंड गंगागिरी महाराज हरिनाम सप्ताहाचे निमंत्रण कमिटीच्या वतीने देण्यात आले.

त्याचप्रमाणे अभविपच्या वतीने शिर्डीत मेडिकल कॉलेज व्हावे यासाठी निवेदन पत्र देण्यात आले. या वेळी चेतन कोते, मयूर चोळके, महाजन आदि उपस्थित होते. या वेळी साईबाबा संस्थानच्या वतीने डॉ. सुरेश हावरे व उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी जावडेकर यांचा सत्कार केला.