News Flash

१९ कोटी रुपये करवसुलीचे आव्हान

मालमत्ता करवसुलीचे अधिकार एमआयडीसीकडे

नीरज राऊत

ग्रामपंचायत हद्दीतील एमआयडीसी क्षेत्रात असलेल्या जमीन, इमारती आणि मालमत्तांवरील स्वच्छता, दिवाबत्ती आणि मालमत्ता करांची वसुली ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने करण्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. मात्र, तारापूर औद्योगिक वसाहतीतील प्रमुख ग्रामपंचायतींची मिळून १३ कोटी नऊ लाख रुपयांच्या थकबाकीसह चालू वर्षांतील सहा कोटी असे १९ कोटी रुपये करवसुलीचे आव्हान महामंडळासमोर आहे. ही थकबाकी वसूल न झाल्यास करोनाकाळात आर्थिक अडचणी असलेल्या ग्रामपंचायतींकडे निधीची चणचण भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

१३ सप्टेंबर २०१९ रोजी शासनाने काढलेल्या अधिसूचनेनुसार संपूर्ण करवसुलीची जबाबदारी महामंडळावर सोपविण्यात आली आहे. यात महामंडळाने ग्रामपंचायतीच्या मदतीने ही वसुली करायची आहे. याआधी ती ग्रामपंचायतींमार्फत केली जात होती. या अधिसूचनेनंतर ग्रामपंचायतींमार्फत उद्योगांना दिलेल्या मागणीपत्रांना प्रतिसाद लाभला नाही. त्यामुळे आधीची आणि २०१९-२० या आर्थिक वर्षांची मिळून तारापूर एमआयडीसी परिसरातील सहा प्रमुख ग्रामपंचायतीची थकबाकी १३ कोटी नऊ लाख रुपयांवर गेली आहे.

नवीन कार्यपद्धती

* ग्रामपंचायतीने महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व नियम १९६० मधील तरतुदीनुसार प्रचलित पद्धतीप्रमाणे त्यांच्या हद्दीतील एमआयडीसी क्षेत्रातील मिळकतींवर कर आकारणी करावी.

* त्यांची देयके एमआयडीसीच्या स्थानिक कार्यालयाकडे देण्यात यावी. एमआयडीसीने ही देयके संबंधितांना बजावून ग्रामपंचायतीच्या वतीने करवसुली करावी.

* एमआयडीसीने वसूल केलेल्या कराच्या रकमेपैकी अर्धी रक्कम ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करावी.

* उद्योगांमध्ये होणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी एमआयडीसी व ग्रामपंचायतींची संयुक्त समिती स्थापन करावी. थकबाकीदारोंकडून वसुली न झाल्यास त्यांचा पाणीपुरवठा बंद करावा.

अडचणी काय?

मंजुरीपेक्षा अधिक बांधकाम आणि कर चुकू नये यासाठी नियमित मोजमाप घेणे आवश्यक आहे. अनेक कंपन्यांच्या आवारात मोजमाप कर्मचाऱ्यांना प्रवेश देत नाहीत किंवा सहकार्य करत नाहीत. उद्योगांचे मंजूर आराखडे जुने असताना त्यामध्ये नूतनीकरण केलेल्या क्षेत्राचा अंतर्भाव करण्यात येत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2020 12:10 am

Web Title: challenge of rs 19 crore tax collection to midc abn 97
Next Stories
1 अश्लील चित्रफितींमार्फत पैसे कमवणाऱ्यास अटक
2 शहरात करोना रुग्णवाढीचा आलेख उतरणीला
3 पतीने टक्कल लपवल्याची तक्रार
Just Now!
X