दामदुपटीच्या नावाखाली कोटय़वधीची माया उकळल्याप्रकरणी आरोपी रवी ऊर्फ रॉबर्ट बांगर याचा जामीनअर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातही फेटाळला. त्यामुळे पोलीस आता बांगरला अटक करणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
शहरातील कृष्णा व्यापारी संकुलात थाटलेल्या साईकृपा इश्युरन्स अँड मार्केटिंग सव्र्हीसेस कंपनीने दामदुपटीचे आमीष दाखवून शेकडो ग्राहकांना फसवून कोटय़वधी रुपये हडपले. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. आरोपी बांगर याने जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला हेता. परंतु न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यानंतर त्याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. परंतु खंडपीठानेही जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे आता आरोपीला अटक करण्याचे आव्हान िहगोली पोलिसांना पेलवेल का, असा प्रश्न विचारला जात आहे.
साईकृपा कंपनीने बनावट कागदपत्रांच्या आधारे ग्राहकांना सुलभ हप्त्याने कार्डवर सोन्याच्या दागिन्यांचे व दामदुपटीचे आमीष दाखवून लाखो रुपये उकळून गंडविले होते. या प्रकरणी गजानन इंगोले यांच्या तक्रारीवरून िहगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संग्राम सांगळे यांनी दोन आरोपीना उस्मानाबादेत अटक केली. परंतु मुख्य आरोपीचा सहकारी रॉबट बांगरला अटक करण्यात पोलिसांना अपयश आले, यावर उलट-सुलट चर्चा होत होती.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांची भूमिकाही संशयास्पद असल्याची चर्चा होती. या प्रकरणी इतर आरोपींना उशिरा का होईना पकडण्यात पोलिसांना यश येते. परंतु िहगोलीसारख्या ठिकाणी घडलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात आरोपी बांगर पोलिसांना सापडत  का नाही, हाच येथे चर्चेचा विषय आहे.